‘.तो मैं खुद की भी नहीं सुनता’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “राज्य सरकारचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं.
या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना तुफान फटकेबाजी केली.
‘काही लोक आले आणि फक्त पर्यटन करून गेले, २ तासही सभागृहात बसले नाहीत’, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदेंनी शेरोशायरी केल्याचंही पाहायला मिळालं. ‘एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“विरोधकांनी संपूर्ण अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाच्या शिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही, हे दुर्देवं आहे. पण विरोधकांकडे संख्याबळ नाही ही आमची चूक नाही. तो जनतेने कौल दिलेला आहे, तो कौल त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण काही लोक बाहेर बोलतात, येथे सभागृहात येऊन बोलत नाहीत. आम्हाला देखील आरोप करता येतात. मात्र, आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत. काही लोकांच्या अंगात नही बळ अन् चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची आहे. आता काही लोक आले आणि फक्त पर्यटन करून गेले. आले, फिरले आणि गेले. हे कोणी वैयक्तिक घेऊ नये, मी वैयक्तिक कोणाबाबत बोलत नाही. सभागृहात एकही प्रश्न न विचारणारेही काही सदस्य आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
“काही लोकांनी कर्ज माफीचा विषय काढला, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. आम्ही कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. त्यामुळे सगळं बरोबर होईल. आता विरोधक म्हणाले होते की लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही. पण लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मात्र, येथील काही लोक तर त्या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. पण त्या लोकांना न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली. आम्ही जे बोलतो ते करतो. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी सुनता नहीं. त्यामुळे कर्जमाफी आम्ही करणार, चिंता करण्याचं काही कारण नाही”, असंही शिंदे म्हणाले.
“सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठिमागे उभं राहिलं पाहिजे. त्याबाबत राजकारण करता कामा नये. काही लोक गेले आणि कुठे-कुठे जाऊन आले. पण आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो आणि आम्ही आमचा शब्द पाळला”, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….