लोकसभा, विधानसभेला जितका झटलो नाही तितकं महापालिका निवडणुकीला झटेन ; गणेश नाईक यांचे वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जितका झटलो नाही, तितका महापालिका निवडणुकांना झटेन असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत बोलताना केले. नवी मुंबईत प्रभाग बदलामुळे माजी नगरसेवकांवर निर्माण झालेल्या निराशेवर धीर देत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न नाईक यांनी यावेळी केला.
नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाईक आणि शिंदे यांच्या संघर्ष देखील पाहायला मिळाला. नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार असे वक्तव्य गणेश नाईक यांनी केले आहे. त्यामुळे नवीमुंबई महापालिका निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी गणेश नाईक सक्रीय झाले असून त्यांनी महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यावर भर दिला आहे. गणेश नाईक यांच्या या पुढाकारामुळे पक्षातील एकजूट वाढली आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्व माजी नगरसेवकांना सांगितले की, “तुम्ही जिथे उभे राहाल, तिथल्या जनता तुम्हाला नेतृत्व देईल. त्यासाठी मी गल्ली-गल्लीत फिरेल, महापालिकेत जास्त झटेन. तन-मनाने आणि आवश्यकतेनुसार जे काही करता येईल, ते मी पूर्ण करेल.” प्रभाग पुनर्रचनेमुळे अनेक माजी नगरसेवकांना नाराजी होती. परंतु नाईक यांच्या या भेटीने त्यांच्यात आत्मविश्वास परत आला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….