नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या घाटात मोठा अपघात, संरक्षण कठडा तोडून इनोव्हा घाटात कोसळली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- “नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या प्रसिद्ध अशा सप्तश्रृंगी देवीच्या गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटात एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या कारमध्ये सर्व भाविक होते.
सर्व भाविक हे सप्तश्रृंगी देवीच्या गडावरुन दर्शन घेऊन परतत होते. यावेळी घाटात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. ही कार थेट खोल दरीत कोसळली आहे. त्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या कारमध्ये नेमकं कोण होतं आणि ते सुरक्षित आहेत का? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दर रविवारी भाविकांची गर्दी होत असते. भाविक मनोभावे देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात. याशिवाय शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी असते. अशाचप्रकारे पाच भाविक हे इनोव्हा कारने देवीच्या दर्शनाला गेले होते. ते देवीचं दर्शन घेऊन परतत असताना घाटात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
संरक्षण कठडा तोडून इनोव्हा कार घाटात कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आली आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….