5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पाच डिसेंबर नंतर आता राज्यातील काही शाळा 9 डिसेंबर रोजी सुद्धा बंद राहणार आहेत.
राज्यभरातल्या शाळा 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार असे संकेत मिळतं आहेत.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आंदोलन करणार आहेत आणि यामुळे 5 डिसेंबरला राज्यातील शाळा बंद राहतील अशी माहिती समोर येत आहे.
उद्या अर्थातच पाच डिसेंबर रोजी राज्यातील मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्य शिक्षण संस्थाचालक मंडळ आणि मुख्याध्यापक महामंडळाने हा निर्णय घेतला असून उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांकडून मोर्चा काढला जाणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकात शाळा बंद आंदोलन त्वरित रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी राज्यातील कोणतीच शाळा आंदोलनासाठी बंद ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. याबाबतचे निर्देश शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे या आदेशात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, ज्यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश राहणार असा इशारा शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
दुसरीकडे शिक्षकांनी पाच डिसेंबर नंतर 9 डिसेंबरला देखील शाळा बंद ठेवण्याची तयारी दाखवली आहे. नागपूर जिल्ह्यातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहण्याचे संकेत मिळत आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षेची सक्ती म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेचा शासन निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळे या अशा सर्व विद्यार्थी व शिक्षण विरोधी शासन धोरणाच्या विरोधात आता शिक्षकांनी शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील शासन धोरणाच्या विरोधासाठी 9 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर जात शाळा बंद ठेवत विधानभवनावर धडक मोर्चा काढणार आहेत.
नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील शाळा पाच डिसेंबर सोबतच 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार असे चित्र आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….