केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, सांगलीतल्या इस्लामपूर शहराचं नाव बदललं, आजपासून ईश्वरपूर नवं नाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करावं, अशी मागणी सातत्याने अनेकांकडून करण्यात येत होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता.
अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी इस्लामपूरचं नाव बदलण्यात आलं आहे. याबाबत आजच अध्यादेश निघाला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
“सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नामांतर ईश्वरपूर करण्यात यावं, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला. त्यामुळे इस्लामपूरचं नाव आसा ईश्वरपूर राहणार असल्याची अधिसूचना आजच जाहीर झाली आहे. आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
“सामान्य प्रशासन विभागाने हा मोठा निर्णय आज अधिसूचना जारी करुन जाहीर केला. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. इस्लामपूर नगरपरिषदेच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी त्यांनी पूर्ण केली. आजपासून इस्लामपूर नगरपरिषदेला ईश्वरपर असं नाव देण्यात आलं आहे”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अनेकवेळा याबाबत मागणी केली होती. जनतेने वारंवार इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा, असं निवेदन दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता. गृह मंत्रालयाने ही मागणी मान्य केली. कोण विरोध करतं याला अर्थ नाही. जनतेची मागणी होती. ती मागणी मान्य झाली. महाराष्ट्र सरकारची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केली. त्यामुळे ईश्वरपूर हे नाव आलेलं आहे. इस्लामपूरचं नाव बदललं”, असं बावनकुळे म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….