भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले, नेमकं काय म्हणाले?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मतदारचे ओळख केंद्र आम्ही शाखेत सुरु करणार आहोत. सक्षम अँप आणि निवडणूक आयोग सर्व्हर हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. कोणीतरी माझ्या नावाने अँपमध्ये रजिस्टर केलं आणि मग ओटीपी आला असणार, ज्यातून माझे आणि माझ्या कटूबांचे नाव वगळले गेले असते.
आम्ही मतदारांना सांगतो तुम्ही शाखेमध्ये या. तुमच्या नावात गोंधळ नाही ना? तुमची नावं तपासून घ्या. हिसगळी निवडणूक आयोगाची (Election Commission) भूताटकी आहे. त्यामुळे दुसरे कोणी मतदार तुमच्या पत्यावर असतील तर ते निदर्शनास आणून द्या. सरकार झेन-जीला घाबरतय. आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचेसांगतशिवसेना (Shiv Sena UBT)प्रमुखउद्धवठाकरे (Uddhav Thackeray)यांनीसरकारआणिनिवडणूक आयोगावरसडकूनटीकाकेलीआहे.
हिसगळी निवडणूक आयोगाची भूताटकी
पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेलाय. आम्ही मोर्चा काढला होता, आमची मागणी होती कि, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आत्ता केंद्राचा पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी? शेतकऱ्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे कीं नाही भरायचे? मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे, आमच्याकडे कुठलीही समिती नव्हती. दिवाळी आधी पैसे शेतकऱ्यांना मिळतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोकळ आश्वासन दिलंहोतं. आत्ता ते मिळाले की नाही ते बघू असेअसताना
दरम्यान, हा आगपाखड करण्यासाठीचा दौरा नाही. जे पॅकेज जाहीर केलं होत त्यातले किती पैसे आले ते बघणार आहे. नेमकं सरकार काय करणार आहे? घोषित झालेल्या पॅकेज मधले शेतकऱ्याना काय मिळाले? यासाठी मी मराठवाडा दौरा करणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उभी आहे. असेहीउद्धवठाकरेम्हणाले.
आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन, त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं
दरम्यानपुढेबोलतानाउद्धवठाकरेयांनी आशिष शेलार यांच्याटीकेलाहीजोरदारप्रत्युत्तरदिलंय. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा ते मानतच नव्हते. त्याच्यामुळे आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवलंय, हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल. देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये प्रचार करुन आल्यानंतरच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलारांनी सिद्ध केलंय की, मतदार यादीत गोंधळ आहे. असेहीउद्धवठाकरेम्हणाले.
माविआने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला
दरम्यान, राज्यासहदेशातमतचोरीआणिबोगस याद्यांचामुद्दागाजतअसतानाठाकरेबंधूनीएकत्रयेतसत्ताधारीबाजपआणिमित्रपक्षांवरसडकूनटीकाकेलीआहे. याटीकेलाभाजपनेतेआणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तरदिलं. यात त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत, ‘गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!’ अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत ‘महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला,’ असे त्यांनी म्हटले. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला.
मतदार यादीमध्ये घोळ, राज ठाकरेंनी यादीच दाखवली
दरम्यान, नुकताच मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ (Mumbai Satyacha Morcha) काढण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचेसांगतपुरावेसादरकेले. सोबतच पुराव्याचा भलामोठा गठ्ठाच समोर आणला. मतदार यादीमध्ये घोळअसताना निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025 च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली.
कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?
मुंबई उत्तर – 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)
मुंबई उत्तर पश्चिम – 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)
मुंबई उत्तर पूर्व -92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)
मुंबई उत्तर मध्य – 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)
मुंबई दक्षिण मध्य – 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)
मुंबई दक्षिण – 55,205दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)
नाशिक – 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)
मावळ – 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)
पुणे – 1,02,002दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)
ठाणे – 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….