तोंडाचा आ वासला, डोळे सताड उघडे, मुंबईत ज्येष्ठ महिला वकिलाचा कोर्टातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतील किल्ला कोर्टाच्या बाररूममध्येच एका ज्येष्ठ महिला वकिलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील या न्यायालयात गुरुवारी दुपारी वकील मालती रमेश पवार (59) यांना हृदयविकाराचा झटका आला.
तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप त्यांच्या पतींनी केला आहे.
फॅमिली कोर्ट व हायकोर्टातील अनुभवी वकील
मालती पवार या ठाण्यातील माजिवडा भागातील रहिवासी असून, गेल्या तीन दशकांपासून कायदे व्यवसायात कार्यरत होत्या. त्या फॅमिली कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि इतर स्थानिक न्यायालयांमध्ये वरिष्ठ वकील तसेच मध्यस्थ (Mediator) म्हणून काम करत होत्या. सहकाऱ्यांमध्ये त्या शांत, समजूतदार आणि अनुभवी वकील म्हणून ओळखल्या जात.
कोर्टातच आली अस्वस्थता, मदतीऐवजी व्हिडिओ शूट
घटनास्थळावरील माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मालती पवार एका प्रकरणाची प्रमाणित प्रत (Certified Copy) मिळवण्यासाठी किल्ला कोर्टात गेल्या होत्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या बाररूममध्ये विश्रांतीसाठी गेल्या. त्या वेळी त्यांनी आपल्या पतींना फोन करून सांगितले, ‘माझी तब्येत बरी नाही, मी थोडा वेळ बसते.’ यानंतर थोड्याच वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
याबाबत त्यांचे पती रमेश पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ‘माझी पत्नी कोसळल्यानंतर कोणीही सीपीआर दिला नाही. उलट काही जण तिचा व्हिडिओ शूट करत होते. जेव्हा ती बेशुद्ध होती, तेव्हा काही लोक तिला पाणी आणि चहा देत होते. कोर्टाच्या अगदी शेजारी जीटी हॉस्पिटल असूनही तिला तातडीने नेले गेले नाही,’ असे त्यांनी म्हटले.
जीटी हॉस्पिटल जवळ असूनही विलंब
रुग्णालय अगदी शेजारी असूनही वेळेत उपचार न मिळाल्याने परिस्थिती गंभीर झाली. नंतर आझाद मैदान पोलिसांनी मालती पवार यांना कामा रुग्णालयात नेले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्या आधीच मृत झाल्याचे घोषित केले.
यावरून रमेश पवार म्हणाले, ‘संध्याकाळी साडेसहा वाजता मला आझाद मैदान पोलिसांकडून फोन आला की, माझी पत्नी रुग्णालयात दाखल आहे. पण रुग्णालयात पोहोचल्यावर मी पाहिलं, ती स्ट्रेचरवर तिच्या बॅगेसह पडली होती. कोणताही सहकारी उपस्थित नव्हता,’ असे त्यांनी म्हटले
न्यायालयात मूलभूत वैद्यकीय सुविधा आवश्यक
आपल्या पत्नीच्या निधनानंतर रमेश पवार यांनी न्यायालय व्यवस्थेकडे संताप व्यक्त केला. ‘किल्ला कोर्टात किंवा इतर न्यायालयांमध्ये डॉक्टर, फर्स्ट एड किट किंवा ऑक्सिजन सिलिंडर यासारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधा नाहीत. तात्काळ उपचार मिळाले असते, तर माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता. मी आता इतर कोणत्याही वकिलाची अशी शोकांतिका होऊ नये, अशीच अपेक्षा करतो,’ असे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….