महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल; सोनू उर्फ भूपतीसह 60 जणांची शरणागती, मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत दिली….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गडचिरोलीत माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर माओवाद मुक्त महाराष्ट्रच्या शक्यतेला जोरदार बळ प्राप्त झाले आहे . माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यां सह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याउपस्थितीतहा आत्मसमर्पण कार्यक्रम आजगडचिरोलीतपारपडतोय. यावेळी शरणागती पत्करणारे माओवादी त्यांचे शस्त्र मुख्यमंत्र्यांना सोपवत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संविधानाची प्रत सुपर्दकेलीआहे.
1980 पासून गडचिरोलीत माओवाद सशस्त्र चळवळ, 538 सामान्य नागरिकांचा बळी
दरम्यान, 1980 पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या माओवाद सशस्त्र चळवळीत आजवर माओवाद्यांनी 538 सामान्य नागरिकांचे जीव घेतले आहे. अशातच ‘सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात यावे’, अशी भूमिका माओवादी नेता सोनू उर्फ भूपतीने मांडली होती. अशातचआता त्याच्यासह 60 हून अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.
माओवाद्यांचा टॉप माओवादी नेता भूपती नेमका कोण?
माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव (Venugopal Rao) उर्फ सोनू उर्फ भूपती हा नक्षल चळवळीतील मेंदू समाजाला जातो. त्याने 2 नोव्हेंबर 1980 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मोयाबिनपेठा येथे सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये पहिली चकमक झाली होती. तेव्हा तत्कालीन सीरपूर दलमचा पेद्दी शंकर हा माओवादी कमांडर ठार झाला होता. आणि तेव्हाच माओवाद्यांविरोधातला पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जवळील अमरादी या गावात माओवाद्यांनी पहिल्यांदा सामान्य व्यक्ती वर हल्ला केला होता. तेव्हा त्या भागातील शिक्षक राजू मास्टर यांचा उजवा हात माओवाद्यांनी कापला होता.
मुख्यमंत्र्यांनी भूपती संदर्भात पोलिसांकडून देण्यात आलेला शब्द पाळला
भूपती शरण येऊ शकतो, मात्र तो तेलंगणाला शरण जाईल किंवा छत्तीसगडला तो शरणागती पत्करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, भूपतीने महाराष्ट्र पोलिसांसमोर शरण जाणे मान्य केले. गेले काही दिवस मध्यस्तांच्या माध्यमातून भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. शासनाला शरण गेल्याने आणि शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याने काय फायदे होतील हे समजवण्यात पोलीस आणि त्यांचे मध्यस्थ यशस्वी ठरले. मात्र, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणगतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द आज मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळत आहेत.