“अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा खुन, पत्नी व प्रियकर यांना जन्मठेपेची शिक्षा” ; पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अनैतिक संबधात अडसर ठरणा-या पतीचा काटा काढण्याचा कट रचुन घटनेच्या दिवशी पत्नी व प्रियकराने त्याचेच घरात त्याचा ओढणीचे सहायाने गळा आवळुन खुन केला व प्रियकरास घटनास्थळावरून पसार केले व पत्नी घटनास्थळी रडत बसली. परंतु या अनैतिक प्रेम प्रकरणाची माहिती मृतकाचे भावाला माहित असल्याने त्याने दिलेल्या तकारीवरून मृतकाचे पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले. वि.न्यायालयात मामला पुराव्यासाठी आला असता सहायक सरकारी अभियोक्ता अॅड रवि केशवराव रूपुरकर यांनी ११ साक्षदारांच्या साक्षी तपासल्या अंती व सादर केलेल्या युक्तीवादाअंती आरोपी मृतकाची पत्नी व तीचे प्रियकराने संगणमत करून खुन केल्याचा गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपीस भा.दं.वी. चे कलम ३०२ सह ३४ अनुसार जन्मठेप व प्रत्येकी पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची शिक्षा असा महत्वपुर्ण निकाल येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क. १ श्रीमती एस. जे. रामगडीया यांनी जाहिर केला.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, यातील मयत सतपालसिंग उर्फ बबलु सुरजसिंग यादव व त्याचा भाउ फिर्यादी विजयपाल सुरजसिंह यादव हे हरियाणा येथील असुन ते कामानिमीत्त पुसद येथे अंदाजे २५ वर्षापुर्वी कामानिमीत्त आले होते. मयत सतपालसिंह चा विवाह मधुकरनगर येथील रहिवासी आरोपी क. २ सुमन उर्फ बाली वय ३० वर्ष हिच्यासोबत झाला होता. त्या विविह संबधातुन त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाले होते.
दिनांक १७ जुन २०१७ रोजी सकाळी मयत सतपालसिंग हा त्याचे घरामध्ये मृतावस्थेत असल्याची माहिती फिर्यादी तथा मृतकाचा भाउ विजयपाल यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्याठिकाणी त्याचा भाउ सतपालसिंग हा मृतावस्थेत दिसला त्याचे गळ्यावर काळसर निशाण दिसले. त्यावरून मृतकाची पत्नी यांना विचारले असता तिने काहि माहिती दिली नाही. त्यानंरत फिर्यादी विजयपाल यांनी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे मृतकाची पत्नी सुमन व तीचा प्रियकर शैलेंद्र खिल्लारे यांचे प्रेम प्रकरणात अडसर ठरणारा मृतक असल्याने त्याचा संगणमत करून गळा आवळुन जीवाने ठार मारले असल्याबाबतची तक्ार दाखल केली त्यावरून पोलीसांनी दोन्ही आरोपीतांवर भादविचे कलम ३०२ सह ३४ नुसार गुन्हा नोंद करून सहायक पोलीस निरीक्षक ब्रिजपालसिंग ठाकुर यांनी तपास केला. त्यामध्ये आरोपी शैलंद्र व सुमन यांचे ाटनेपुर्वी सहा महिण्या अगोदर पासुन प्रेमसंबध होते. त्याची माहिती मृतक यास झाल्याने त्याने
दोघांनाही समजुन सांगीतले होते. व यामुळे दोघा आरोपींच्या प्रेमसंबधात मृतकाचा अडथळा होत असल्याने आरोपी पत्नी व प्रियकराने कट रचुन मृतकाचे खुन करण्याचे ठरविले आणि घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक १६ जुन ते १७ जुन २०१७ चे रात्री दरम्यान आरोपी शैलेद्र यांनी आरोपी सुमन यांनी मृतक याचा ओढणीचे सहायाने गळा आवळुन खुन केला. हि बाब दोन्ही आरोपींनी पोलीसांनी खाक्या दाखविताच कबुन केली. यातील इतर साक्षदारांच्या बयाणवरून दोषारोपपत्र दाखल केले.
सदर मामला वि.न्यायालयात पुराव्यासाठी आला असता सरकारी पक्षातर्फे शासनाची बाजु सरकारी वकील अॅड. रवि केशवराव रूपुरकर यांनी सादर केलेले ११ पुरावे व सादर केलेल्या युक्तीवादाअंती आरोपीवर दाखल असलेला खुनाचा गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस भा.दं.वी. चे कलम ३०२ सह ३४ अनुसार जन्मठेप व प्रत्येकी पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची शिक्षा असा महत्वपुर्ण निकाल येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क. १ श्रीमती एस. जे. रामगडीया यांनी दिनांक ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी जाहिर केला. सदर प्रकरणात वसंतनगर पो.स्टे. येथे कार्यरत असलेले पैरवी अशपाक नौरंगाबादी यांनी काम पाहीले.