राधाकृष्ण विखे पाटील व मनोज जरांगे यांची अंतरवालीत भेट; कोणत्या विषयावर चर्चा..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वडीगोद्री :- “मराठा उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे सायंकाळी 6.10 वाजता दाखल झाले आहे. 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यभरात ओबीसी समाज मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला विरोध करत असताना, विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली आणि त्यातून काय निष्पन्न झाले, हे अध्याप समोर आले नाही. मात्र, हीभेट आरक्षण लढ्यातील पुढील घडामोडींसाठी महत्त्वाची ठरणार आहे.