मेडिकल स्टोअर्समध्ये ‘ते’ विषारी औषध दिसले तर लगेच फोन करा, राज्य सरकारकडून महत्त्वाचे आवाहन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा (Cough Syrup) होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकरणामुळेसर्वत्रमोठीखळबळउडालीआहे. दरम्यान या गंभीर प्रकरणी आतामहाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून याप्रकरणीचीदखलघेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे. कोल्ड्रिप सिरप (MP Cough Syrup) हे मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकवर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या औषधामधे डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. परिणामीही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, सर्व परवानाधारकांना आणि सामान्य जनतेला कोल्ड्रिफ सिरप (बॅच क्रमांक SR-13) ची विक्री, वितरण किंवा वापर तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल (Coldrif Cough Syrup Ban)
दरम्यान, कोल्डरिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या कांचीपुरम युनिटमध्ये केलेल्या तपासणीत कोल्डरिफ कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल आढळून आले, ज्याचे प्रमाण 0.1% पेक्षा जास्त नसावे. असे नोंदवले जात आहे की डायथिलीन ग्लायकोल अत्यंत विषारी आहे. असा दावा केला जात आहे की, कफ सिरप प्यायल्यानंतर मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले. ते गंभीर आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात 14, तर राजस्थानात 3 मुलांचा मृत्यू (Cough Syrup Death Case)
विषारी कफ सिरप पिण्यामुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशात 14 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये 3 मुलांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशात 14 मुलांच्या मृत्यूनंतर, कोल्ड्रिफ कफ सिरपची चौकशी सुरू आहे. कफ सिरप पिल्यानंतर या मुलांचा मृत्यू का झाला? याचा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. या मृत्यूंनंतर, मध्य प्रदेशात या सिरपवर बंदी घालण्यात आलीय. तर एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली आणि उत्पादक कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश (Government Instructs All States to be Alert)
नागपूरमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 14 लहान मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर राजस्थानमध्येही तीन मुलांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलांना दिलेल्या ‘कोल्ड्रिफ’ कफ (MP Cough Syrup) सिरपमुळे दुष्परिणाम झाले असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ सरकारांनी तत्काळ निर्णय घेत ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या (MP Cough Syrup) विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
छिंदवाड्यातील या घटनेनंतर बालऔषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, विविध ठिकाणी या सिरपचे नमुने (MP Cough Syrup) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मध्य प्रदेश व राजस्थान या ठिकाणी संशयीत कफ सायरफमुळे बालकांच्या मृत्यूनंतर नागपुरातही अन्न व औषधी प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आले आहे.(MP Cough Syrup)
Nagpur Mystery Death: 10 मुलांच्या मृत्यूचं गूढ कायम, NIV रिपोर्ट कधी येणार?
– 10 बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?
– विदर्भ आणि मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात संशयित ए इ एस या मेंदूज्वराचे (Acute Encephalitis Syndrome) रुग्ण सापडत आहे का?
– असे असताना एइएस जापानी एन्सेफेलायटिस आणि चांडीपुरा व्हायरस चे चाचणी अहवाल नकारार्थी? मग मृत्यूचे नेमके कारण काय?
– पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NIV) तपासणी अहवाल केव्हा येणार?