सुशांत प्रकरणी भाजपानं कधीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नाही : देवेंद्र फडणवीस
: सीबीआय येईपर्यंत अनेक खुलासे का झाले नाही ?, फडणवीसांचा सवाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला. या तपासादरम्यान आता दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपानं कधीही आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नसल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. माध्यमांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
“या प्रकरणात भाजपाच्या कोणत्याही नेत्यानं आदित्य ठाकरे यांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नाव घेतलेलं नाही. सुशांत सिंहप्रकरणी आता जी जी माहिती समोर येत आहे ती सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहे. सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा एक नक्कीच प्रश्न आहे. याव्यतिरिक्त जे निरनिराळे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचीही उत्तरं देण्याची आवश्यकता आहे,” असं फडणवीस म्हणाले.
आज जवळपास ४० दिवसांनंतर सीबीआय आली. माध्यमांमधून मला आठ हार्डडिस्क नष्ट करण्यात आल्या, किंवा काही पुराव्यांबाबत माहिती पाहायला मिळत आहे. यातून मुंबई पोलिसांवर काय दबाव होता किंवा अडचण होती अथवा राजकीय दबाव होता की त्यांनी याची तपासणी केली नाही असा नक्कीच प्रश्न उद्भवत असल्याचे ते म्हणाले. “आता सीबीआय सत्य बाहेर काढेल. परंतु हे जर आधी बाहेर आलं असतं तर आपल्याला सत्य लवकर समजलं असतं. काय घडलं कोण यामागे आहे हे समजलं असतं,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरेंनी ‘ओळख पुसली’
महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या चर्चेत आहेत. यामागील कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये केलेला बदल ठरत आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइवरुन ‘महाराष्ट सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री’ हे शब्द काढून टाकले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे यावरुन चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरे यांनी अचानक ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल कऱण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना किंवा आदित्य ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….