भारती मैंद पतसंस्थेत सर्वांच्या ठेवी सुरक्षित :- अँड. आप्पाराव मैंद ; ठेवीदारांनी भीती बाळगू नये…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामान्यांना आर्थिक मदत व्हावी या उदात्त हेतूने २५ वर्षांपूर्वी माझी कन्या भारतीच्या नावाने भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली. आज या पतसंस्थेच्या १८ शाखा कार्यरत आहेत. स्वच्छ व पारदर्शक व्यवहार करण्यात आला. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. दरवर्षी पतसंस्थेला लाखो रुपये नफा आहे. अनेकांना या पतसंस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळवुन दिला. मोठ्या प्रमाणात कर्मचारी पतसंस्थेत कार्यरत आहेत. आलेल्या ठेवीमधून ७० टक्के कर्ज वाटप करण्यात आले. ३० ठेवी सुरक्षित आहेत. परंतु एका तांत्रिक कारणामुळे ठेवीदारांचा गैरसमज झाला आणि भारती मैंद पतसंस्थेतून ठेवीदाराने ठेवी काढून घेणे सुरु आहे. सर्व ठेवीदारांना मी आश्वस्त करतो की, आपल्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत. शांततेच्या मार्गाने प्रकरण निवळल्यानंतर आपल्याला गरज भासेल त्या प्रमाणे ठेवी परत करु. त्यामुळे ठेवीदारांनी पतसंस्थेतून ठेवी काढण्याची घाई करु नये असे जाहीर आवाहन भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. अप्पाराव मैंद यांनी केले आहे. एखाद्या प्रकरणात कर्ज बुडाले म्हणजे त्याचा परिणाम पतसंस्थेवर होत नाही. आमच्या पतसंस्थेत पारदर्शक व्यवहार आहेत. त्यामुळेच विश्वासावर नागरिकांनी ठेवी ठेवल्या आहेत. त्यास तडा जाऊ देणार नाही. काही दिवसांमध्ये सर्व सुरळीत होईल. त्यामुळे ठेवीदारांनी गैरसमज करुन घेऊ नये. आपल्या ठेवीमधून कर्ज दिल्यामुळे वसुली सुरुच आहे. काल पर्यंत ठेवीदारांना नियमित व्याज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. चौकशी मध्ये चौकशी करणाऱ्याने बाईट दिल्यामुळे लोकांत संभ्रम होणे साहजिक आहे असे सांगुन अॅड. मैंद म्हणाले, मी स्वतः नागपूरला जाऊन इन्व्हेस्टीगेटरला सर्व माहिती दिली आहे. यामध्ये संचालक मंडळ एक दिलाने असुन आपल्या ठेवी सुरक्षित आहेत. कोणीही काळजी करु नये असे अॅड. अप्पाराव मैंद यांनी ठेवीदारांसाठी आवाहन केले आहे. भारती मैंद पतसंस्था ही सामाजिक उपक्रमामध्ये सुध्दा अग्रेसर आहे. झालेल्या नफ्यातून सामाजिक उपक्रमासाठी पुसद शहरात विविध कामे करण्यात आली आहेत. मागील ५० वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात मी प्रामाणिकपणे काम केले आहे. कोणाची फसवणूक करणे हे माझ्या रक्तातच नाही. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढुन घेण्याची घाई करु नये. आपल्या ठेवी सुरक्षित आहेत असे शेवटी ते म्हणाले.