मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही साथ देऊ ; ओबीसी-मराठा समाजाबाबत काय म्हणाले शरद पवार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाजाकडून या शासन निर्णयाला विरोध केला जातो आहे. एकंदरितच आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाज राज्यात आमनेसामने आल्याचं चित्र आहे.
यावरून राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीहीदेखील याबाबत भाष्य केलं.
शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यातील ओबीसी-मराठा संघर्षाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना असा संघर्ष टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच मराठावाड्यातील पूरपरिस्थितीबाबत बोलताना, केद्रांकडून मदत मागावी, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
”राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातो आहे. राज्य सरकार काही हालचाल करायला लागलं, असं हे दिसत आहे. दोन्ही समाजातील कटुता कमी करणे आणि सर्व घटक गावात एकत्र कसे राहतील यासाठी प्रयत्न करणं हे सरकारचं काम आहे. सरकारने ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सरकारला एकत्र बैठक घेण्याचं आवाहनदेखील केलं. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे, दोन्ही समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्री जर अशी बैठक घेणार असतील, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, असं ते म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी मराठवाड्यात पूरपरिस्थितीबाबतही प्रतिक्रिया दिली. यंदा अभूतपूर्व पाऊस राज्यात पडला आहे. जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत, त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर झाला आहे. सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले आहे, असं त्यांनी संगितलं.
अशा संकटात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत, त्या वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामा करायला हवे, यासगळ्याकडे या राज्य सरकारने गांभीर्याने आणि तातडीने लक्ष द्यायला हवं, असेही ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..