मराठा आंदोलनात शरद पवारांचा हात..? मनोज जरांगेंनी अखेर सत्य सांगून टाकलं, म्हणाले ‘वाशीतून पोरं निघाली तेव्हा…’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला आता स्वत: मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.
या आंदोलनामागे इतर कुणाचा हात असता तर एकाही मराठ्याला आपण प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. आंदोलनात इतर नेत्याचा हात असता तर ते धिंगाणा घालून मोकळे झाले असते असंही जरांगेंनी सांगितलं.
“मी आज सत्य सांगतो की, मी कधीच बोललो नाही. हल्ला झाल्यानंतर आमच्या माय माऊली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. शरद पवारांपासून, ठाकरेंपासून काँग्रेस, शिवसेना, भाजपा सगळ्या पक्षाचे लोक आधार देण्यासाठी आले होते. ती माणुसकी होती. हे आंदोलन कोणाच्या बोलण्यावर झालं असतं तर मी माझ्या मराठ्याला एकही प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो. इतके दिवस हे आंदोलन चालूच शकलं नसतं. दुसरे असते तर धिंगाणा घालून मोकळे झाले असते. वाशीत अधिसूचना घेतल्यानंतर शांततेत परत आले होते. नेत्याचा हात असता तर जागेवर दंगली केल्या असत्या. आता जीआर काढला, पाठीमागून कोणी असतं तर गोंधळ घाला म्हणाले असते. आम्हाला आरक्षण हवं आहे, राजकारण नको,” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
“यांनी सगळं शोधलं आहे. आमच्या मागे शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेत का? हे सगळं शोधलं. पण यांना काहीच सापडलं नाही. एकदा शरद पवारांचे लोक आहेत म्हणाले. एकदा म्हणे काँग्रेसचे आहेत. एकदा म्हणे शेतकऱ्यांचे आहेत. उद्धव, राज ठाकरेंचे आहेत असंही म्हणाले. एकनाथ शिंदे, फडणवीसांचे आहेत असंही म्हणाले. यांचे थोबाड चपलेने हाणले पाहिजेत,” असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारला अल्टिमेटम
मनोज जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दस-याचा अल्टिमेटम दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार दस-याला प्रमाणपत्रं मिळाली नाहीत, तर दस-यानंतर आपण भूमिका घेणार. मग आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. 2 वर्षं मराठा समाज संयमानं चालला, दस-यानंतर आमचा संयम संपेल. मात्र विखे-पाटील, एकनाथ शिंदे, फडणवीस ही वेळ येऊ देणार नाहीत, असा आपल्याला शंभर टक्के विश्वास असल्याचंही जरांगेंनी सांगितलं.
दिल्लीत मराठा समाजाचं एक दिवसाचं अधिवेशन भरवणार असून तारीख लवकरच सांगणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
1) लक्ष्मण हाके यांनी कोणते आरोप केले?
ओबीसी संघर्ष सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, शरद पवार कुटुंबीय मराठा आंदोलनाला रसद पुरवतात आणि त्यांचे आमदार पैसे व इतर मदत देतात. त्यांनी हे ओबीसी आरक्षणावर हल्ला असल्याचे सांगितले. हाके यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरही बोट ठेवले, ज्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांचे नुकसान होत असल्याचा दावा केला. हे आरोप ३ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
2) मनोज जरांगे यांचे प्रत्युत्तर काय होते?
जरांगे यांनी आरोप फेटाळून लावले आणि म्हटले, “आंदोलनामागे इतर कुणाचा हात असता तर एकाही मराठ्याला प्रमाणपत्र मिळाले नसते.” ते म्हणाले की, हे आंदोलन शुद्ध मराठा समाजाचे असून, इतर नेत्याचा हात असता तर धिंगाणा घालून मोकळे झाले असते. वाशीत अधिसूचना घेतल्यानंतर शांततेने परत आले होते, तर दंगली झाल्या असत्या. आता जीआर काढला असता तर गोंधळ घाला म्हणाले असते. “आम्हाला आरक्षण हवे आहे, राजकारण नको,” अशी त्यांची भूमिका आहे. ही मुलाखत १९ सप्टेंबर २०२५ रोजी झी २४ तासवर प्रसारित झाली.
3) जरांगे यांनी हल्ल्याच्या वेळी पवार कुटुंबाचा उल्लेख कसा केला?
जरांगे म्हणाले, “मी आज सत्य सांगतो की, मी कधीच बोललो नाही. हल्ला झाल्यानंतर आमच्या माय-माऊली रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. शरद पवारांपासून ठाकरेंपर्यंत, काँग्रेस, शिवसेना, भाजप सर्व पक्षांचे लोक आधार देण्यासाठी आले होते. ती माणुसकी होती.” ते म्हणाले की, हे आंदोलन कोणाच्या बोलण्यावर चालले असते तर इतके दिवस टिकले नसते आणि एकही प्रमाणपत्र मिळाले नसते.