आदिवासींमध्ये काही केल्या घुसखोरी होऊ देणार नाही; अन्यथा आम्हालाही….; आमदार किरण लहामटेंचा सरकारला इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात एकीकडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुरावे असलेल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे, ह्याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा (Banjara) समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाकडून होत आहे. तरदुसरीकडेयामागणीलाआता आदिवासी समाजाकडूनदेखीलकडाडूनविरोधहोतअसल्याचेचित्रआहे. आदिवासींमध्ये काहीकेल्या घुसखोरी होऊ देणार नाही, अन्यथा सरकारविरोधात आम्हालाही रस्त्यावरउतरावेलागेल, असाइशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंनी (Kiran Lahamte) सरकारलादिलाआहे. ते अहिल्यानगरच्या अकोले येथेबोलतहोते.
विनाकारण राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…..
आदिवासींमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सध्यासुरुआहे. मात्र राजकीय नेत्यांनी समाजाची दिशाभूल करू नये. महाराष्ट्रात बंजारा काय कुठलाच समाज आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. धनगर आणि बंजारा समाजाला पूर्वीच आरक्षण भेटलेले आहे. विनाकारण राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल. असाइशारा आमदार किरण लहामटेंनीसरकारलादिलाआहे. शिवाय वेळ आली तर आम्ही कोर्टात जाऊ, असेहीतेम्हणालेआहे. आदिवासी समाजाचे आजी-माजी आमदार समाजासोबत आहेत. आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही. असेहीतेम्हणाले.
आम्ही कुणाचं आरक्षण तोडून घेत नाही आणि वाढूनही मागत नाही- धर्मगुरू कबीरदास महाराज
एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता आतापर्यंत स्थापन केलेले आयोग ही सकारात्मक होते. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. त्यानुसार आता बंजारा समाज ही मागणी करू लागला आहे. ही मागणी आमची जुनीच बंजारा आणि वंजारी समाज हा वेगवेगळ्या समाज असून त्यांची बोलीभाषा आणि खानपान पेरावा सगळ वेगळं आहे. त्यामुळे बंजारा आणि वंजारी एक असू शकत नाही. आम्ही कुणाच्या आरक्षण तोडून घेत नाही आणि वाढूनही मागत नाही, असं मत बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी बोलताना सांगितले.