महापालिकेची सत्ता आपल्याच हाती आली पाहिजे, शरद पवारांचा पुण्यात एल्गार, म्हणाले युती करण्यासंदर्भात लवकरच निर्णय….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जागरूक रहावं लागेल. आपण गांधी-नेहरूंचा विचार मांडतो. निवडणुका होतील त्यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सामोरे जाणार आहोत असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
ते पुण्यात बोलत होते. इतर ही काही पक्ष आहेत. त्यातील काही देशात तर काही राज्यात आपल्यासोबत लढतात. आता स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा याबाबतचा निर्णय अध्यक्ष आणि सहकारी निर्णय घेतील. त्यात जागावाटपचाही निर्णय होईल असे शरद पवार म्हणाले. महापालिकेची सत्ता आपल्याच हाती आली पाहिजे, हाच निर्धार करायचा आहे. उद्या युती करायची की नाही? याचा निर्णय लवकरचं होईल. कोणाला संधी द्यायची हा ही निर्णय होईल असे पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे एक विचारधारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे एक विचारधारा आहे. गांधी, नेहरू, आझाद यांची विचारधारा आहे. ही विचारधारा मजबूत करायची आहे. पुण्यात काँग्रेसची जबाबदारी अधिक आहे. काँग्रेस पक्ष स्थापन झाला याचा निर्णय, जन्म हा पुण्यात झाला आहे. दुर्दैवाने त्या आधी तीन दिवस प्लेगची साथ आली आणि पुण्याऐवजी मुंबई मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मात्र मूळ पुण्यात होतं. हे पाहता आपल्या पुणेकरांची जबाबदारी आहे. आजचं आणि 1985 सालच्या पुण्यात जमीन-अस्मानचा फरक आहे. आज रस्त्याने जाणं अवघड आहे, दळणवळणाची साधन वाढली, वाहनं वाढली. आता पूर्वीच पुणे राहिलेलं नाही असे शरद पवार म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
महापालिका निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडून आणले पाहिजेत
पुण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यानुसार गरजाही वाढलेल्या आहेत. पाच लोकांच्या जागेत तीनशे ते चारशे लोक राहू लागलेत. पण या लोकांना मूलभूत सुविधा मिळतायेत का? याला उत्तर शोधायचं असेल तर महापालिका निवडणुका झाली पाहिजे. त्या निवडणुकीत सक्षम उमेदवार निवडून आणले पाहिजेत. यासाठी आपल्याकडे ते चेहरे आहेत. आपल्याला आता नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. इथली सूत्र आपल्या हातात येईल, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे असे शरद पवार म्हणाले.