किरीट सोमय्या ने बांगलादेशी शोधण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये :- डॉ. मोहम्मद नदीम….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज रोजी डॉ. मोहम्मद नदीम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले
केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी तसेच विधार्थाना महाविद्यालयात प्रवेश घेण्याकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड,सारखी कागद पत्रे लागतात आणि ही कागद पत्रे तयार करण्यासाठी जन्म नोंद प्रमान पत्राची आवश्यकता असते. ज्यांची नोंद नाही त्यांना आप आपल्या नोंदी करण्याकरिता 27 एप्रिल 2026 ही शासनाने शेवटची तारीख ठरवली आहे म्हणून ज्यांची जन्मनोद नाही ती मंडळी जन्मनोंदी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.नगर परिषद किवा ग्रामपंचायत येथून जन्मनोंदी नसल्याचा दाखला घेऊन त्यासोबत आवश्यक कागद पत्रे सादर करून सबंधित कार्यालयातून त्याबबबतची चौकशी केली जाते परंतु वर्ष भरापूर्वी पासून माजी खा. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहनगीया नागरिकांचे भारतात शिरकाव झाला आहे अशे सांगून बंगलादेशी नागरिक शोधाच्या मुद्द्यावरून सम्पूर्ण महाराष्ट्रमध्ये मुस्लिम समाजाला लक्ष करण्याचा काम केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमय्या दोन वेळा पुसदला येऊन गेलेले आहे कुठल्याही मुद्याबाबत प्रशासना कडे तक्रार करण्याचा किवा चुकीच्या घटना बद्दल प्रशासनाला अवगत करण्याचा प्रत्येक नागरिकला अधिकार आहे परंतु किरीट सोमय्या या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहे केंद्र आणि राज्यात त्यांच्या पक्षाची सरकार आहे याचा फायदा घेऊन तक्रार इत्यादी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकार्याच्या बैठक घेऊन अधिकारी यांना दबाव टाकणे दमदाटी करून चुकीच्या कारवाया करण्याबद्दल निर्देश देत आहे. बैठकीत प्रशासकीय अडचण समझून घेण्यापेक्षा अधिकार्याना मी सांगतो त्या पद्धतीने काम करा असे निर्देश ते देत आहे ही बाब सहन करण्यासारखी नाही.
जन्मनोंदी हा विषय कोण्या एका समाजापूरता मर्यादीत नाही त्यांच्या या विनाकारण च्या कृती मुळे सर्व सामान्य नागरिक वेठीस धरल्या जात आहे त्यांच्या या उपद्रव आणि भ्रामक वक्त्याव्यामुळे शासनाने दि.12 मार्च 2025 रोजी जन्मनोद करण्याकरिता दिशा निर्देश देण्यासाठी शासनाने अध्यदेश काढला आहे त्यात जन्मनोंदी नसल्याचा दाखला मिळविण्याकरिता सुद्धा 13 कागद पतत्रांची यादी प्रकाशित केली आहे ही अट त्रास दायक आहे सर्व सामान्य नागरिकांना वरील कागदपत्रे तयार करणे सोपे नाही म्हणून शासनाने सदर अद्यादेश रद्द करावा व सामान्य नागरिकांना सोप्या सोईस्कर अशा अटी घालून दुसरा अद्यादेश काढावा.
किरीट सोमय्या वर्षभरा पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून फेक प्रकरणे सादर करीत आहे त्यांच्या या मोहिमेत आज पर्यन्त एकही बांगलादेशी सापळला नाही फक्त त्यांच्या भ्रामक वक्तव्यामुळे सामाजिक तनाव निर्माण होत आहे.
जन्मनोंदीचा प्रश्न सर्व समाजाचा आहे परंतु मुस्लिमांना टारगेट करून किरीट सोमय्या जे वक्तव्य देत आहे त्यामुळे सामाजिक तणावं निर्माण होत आहे.
पुसद शहरात मागील काळात एक दोन अनुचित प्रकार घडले 2009 साली जातीय दंगल सुद्धा झालेली होती त्या मुळे पुसद शहराची अतीसंवेदनशील शहर म्हणून नोंद झालेली आहे पुसद शहराचा सामाजिक एकोपा व सदभावना कायम राहावा जातीय दृष्टीने संवेदनशील शहर म्हणून असलेली नोंद संपवावी या साठी शहरातील हिंदू मुस्लिम जावबदार नागरिकांनी प्रयत्न केलेले आहे आणि आज रोजी पुसद शहरात सदभावना प्रेम सामाजिक एकोपा आहे या सामाजिक एकोप्याला तळा देण्याचा काम किरीट सोमय्या करीत आहे. मागील आढवड्यात किरीट सोमय्या पुसद ला येऊनविनाकारण बडबड करून गेलेले आहे त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि त्याचा प्रतिकार करावा अशी जनभावना निर्माण झाली होती परंतु सामाजिक सलोखा बिघडू नये या साठी जबाबदार व्यक्तींनी पुढकार घेऊन थांबवले होते किरीट सोमय्या यांना कही चुकीचे वाटत असेल तर त्यांनी मुखमंत्री,मुख्य सचिव यांच्या कडे पूर्वी सदर केलेल्या प्रमाने ट्रक भरून तक्रारी व पुरावे सादर करावे. ते योग्य ती कार्यवाही करतील विना कारण शहरा शहरात फीरून राज्यातला जातीय सलोखा खराब करू नये विशेषत पुसद शहरातील हिंदू मुस्लिम जवाबदार नागरिकांनी, नेत्यांनी आणि पोलिस व प्रशासकीय अधिकार्यानी प्रयत्न पूर्वक सदभावना व सामाजिक एकोपा कायम ठेवला आहे आणि संवेदनशील शहराच्या यादीमधून पुसद शहराचे नाव वगळल्या जातील अशे काम केलेले आहे अशा वेळी किरीट सोमय्या यांना कोणते ही संवेधानिक पद नसताना त्यांना शासकीय यंत्रनेत हस्तक्षेप करण्याचा तसेच या प्रकरणात अधिकार्याच्या बैठका घेऊन त्यांना आदेश देण्याचा व दम दाटी करण्याचा कोणताही नेतीक अधिकार नाही.किरीट सोमय्या शहरात येऊन वातावरण खराब करण्याचे काम करीत आहे ते खपवल्या जाणार नाही किरीट सोमय्या शहरात येऊन वातावरण खराब करण्याचा काम करीत असतील तर त्या गोष्टीचा प्रतिकार होईल त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्या साठी किरीट सोमय्या आणि प्रशासन जवाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
सदर पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस अध्यक्ष झिया शेख, सामाजिक कार्यकर्ते मसूद मिर्झा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष तहेसीन खान, काँग्रेस जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष सय्यद जाणी, अल्प. शहर अध्यक्ष जब्बार लाखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.