पंचायत समिती पुसद अंतर्गत विनोबा अँप कार्यशाळा संपन्न…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दि :- १६ /०९/२०२५ रोजी पं.स पुसद येथे जिल्हा परिषद यवतमाळ व ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या सामंजस्य करार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या विशेष पुढाकाराने जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा मधील शिक्षणात नाविन्यताआणण्यासाठी तसेच शिक्षकांचे कार्य सुलभ होऊन सक्षमीकरण व संवाद स्थापित करण्यासाठी त्याचप्रमाणे शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी व शिक्षकांच्या चांगल्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी विना आर्थिक आर्थिक तत्त्वावर आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील तंत्र स्नेह शिक्षकांच्या कार्यशाळाचे आयोजन हाजी अख्तर खान नगरपरिषद उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स गढी वार्ड पुसद इथे संपन्न झाले सदर कार्यशाळेस मा.श्री संजय कांबळे गटशिक्षण अधिकारी पं.स पुसद कु.विश्रांती फोपसे विस्तार अधिकारी शिक्षण तथा समन्वयक मो. जियाऊद्दीन मुख्याध्यापक हाजी अख्तर खान न.प उर्दू विद्यालय गढी वार्ड पुसद यांनी मार्गदर्शन केले तसेच सदर ॲपच्या बाबत श्री.रघुनाथ सर प्रोग्राम मॅनेजर अमरावती विभाग व कु.आशा मॅडम कार्यक्रम अधिकारी हिंगोली यांनी सखोल माहिती देऊन शंका निरसन केले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बीआरसी पुसदचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.