ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सय्यद जानी यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सय्यद जानी यांनी आज, शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी जाहीर केले की लवकरच भव्य कार्यक्रमाद्वारे शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत सामील होणार आहेत.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद, मराठवाडा कमेटीचे प्रा. डॉ. सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे, माजी जिल्हाध्यक्ष इंजी. प्रशांत इंगोले, जिल्हा महासचिव शाम कांबळे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, तसेच सम्यकचे प्रदेश प्रवक्ते कैलास वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आणि सर्व वंचित समाजघटकांसाठी वंचित बहुजन आघाडी करत असलेले काम पाहून मी पक्षात प्रवेश करत असल्याची भावना व्यक्त केली. नुकतीच लातूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सय्यद जानी यांनी प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, आणि आज त्या इच्छेला औपचारिक रूप मिळाले.
यासोबतच मीर अजमत अली, एम. ए. कदीर, महंमद, जावेद खान, शेख शकील शेख इस्माईल, हबीब अहमद यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. तसेच येणाऱ्या काळात पक्ष जे कार्यभार सोपवेल तो आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असे आश्वासन सय्यद जानी यांनी दिले.
यावेळी पक्षाचे नांदेड दक्षिणचे महासचिव महंमद कासीम, कायदेशीर सल्लागार ॲड. शेख बिलाल, मुदखेड तालुकाध्यक्ष मोहन कांबळे, महानगर संघटक अतीक लिडर, उत्तर महानगरचे उपाध्यक्ष सादीक बाचोटीकर, युवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष शहाबोद्यान पठाण, तसेच नागेश दुधमल, अब्दुस समी, इम्रानोद्यीन शेख, सय्यद अशफाक आदी मान्यवर उपस्थित होते.