महागाव ते फुलसावंगी रस्त्याचे रखलेले काम त्वरित सुरू करा : योगेश वाजपेयी
तर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी टेंभी – फुलसावंगी रस्ता दुरुस्त करा
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंजूर असलेल्या महागाव ते फुलसावंगी रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. लॉकडाउन काळात काम पूर्णपणे बंद पडलेले काम अद्यापही सुरु करण्यात आले नाही.तर फुलसावंगी ते टेंभी दरम्यानच्या अर्धवट रस्त्याने मोठे खड्डे पडल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महागाव ते फुलसावंगी रस्त्यांचे काम त्वरीत सुरु करावे अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस योगेश वाजयेयी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे.
केन्द्रीय रस्ते विकास निधीतून जवळपास ३५ कोटी मंजूर झाले आहे. त्यातून हे काम सुरु करण्यात आले होते मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरु असलेले काम लॉकडाउन मुळे बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने रस्त्याची कामे सुरु करण्याबाबत शिथिलता दिली. तरीसुद्धा या मार्गाचे काम सुरु करण्यात आले नाही. उलट टेंभी ते फुलसावंगी दरम्यान रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केलेले “जैसे थे” पडून असल्याने वाहनधारकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. मोठ मोठे खड्डे असल्याने रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अखंडीत पणे फुलसावंगी ते महागाव रस्त्याचे काम पूर्णतः सुरु करण्यात यावे अशायाचे निवेदन योगेश वाजपेयी यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.