‘शिवाजीनगर स्टेशनचं नाव सेंट मेरी करुन काँग्रेसने अपमान केला’, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “कर्नाटकात बंगळुरु शहरात शिवाजीनगर येथेली मेट्रो स्थानकाचं नाव सेंट मेरीज करण्याचा प्रस्ताव काँग्रेस सरकारचा असल्याची माहिती आहे. यावरुन कर्नाटक सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरीज करणं याचा मी निषेध करतो. एकप्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकचं काँग्रेस सरकार करत आहे. याचं मला दु:ख आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“याचं मला नवल वाटत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असल्यापासून आहे. नव्हे तर त्यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलं होतं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्याप्रकारचं मत व्यक्त केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. तीच महाराजांना अपमान करण्याची परंपरा ही सातत्याने काँग्रेसच्या सरकारमध्ये दिसत आहे. आम्ही याचा निषेध करतो. मी इश्वरांना प्रार्थना करतो की, इश्वरांने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुद्बुद्धी द्यावी”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
“ज्यांच्यामुळे या देशाने स्वराज्य पाहिलं, असे छत्रपती शिवराय यांचं नाव बदलून त्या ठिकाणी अशाप्रकारे कुठेतरी धार्मिक अशाप्रकारची विरोधी व्यवस्था उभी करायची आणि तेढ निर्माण करायचं, हे ते करणार नाही, बुद्धी त्यांना मिळावी, ही अपेक्षा”, असं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठवाड्यात सर्वाधिक गुंतवणूक, फडणवीसांची माहिती
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीनंतर राज्यात कुठे किती गुंतवणूक होणार आहे, याबाबत माहिती दिली. या माहितीनंतर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आज कोकण, खान्देश आणि विदर्भात या तीन भागांत गुंतवणूक आली असली तरी 15 दिवसांपूर्वी जास्तीत जास्त गुंतवणूक ही मराठावाड्यात आली होती. मराठवाड्यात विशेषत: DMIC असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि समृद्धीवर जो भाग मराठवाड्याचा आहे त्या सगळ्या भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर हे तर आता इलेक्ट्रिक गाड्यांचं कॅपिटल बनत आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..