जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त मिलाद शरीफ व नातं पठणाचा कार्यक्रम संपन्न….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- “हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांचे 1500 वर्ष पूर्ण झाल्याने जशन ए ईद मिलादुन्नबी च्या शुभ मुहूर्त वर यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद आसिम अली, मिलाप बिल्डिंग मटेरियल चे संचालक अन्वर पठाण, बाबा चाय चे संचालक बाबा भाई, विदर्भ मार्केटिंग चे संचालक मोहम्मद शाहरुख यांचे वतीने जन्नत टॉवर गिलानी ले आऊट येते रुहानी मैफिल चा आयोजन दिनांक 4/9/25 रोजी बाद नमाज ए इशा रात्री 8:30 वाजता केला होता या मैफिलात मोहम्मद पैगंबर (स.अ) च्या शान मध्ये नातं पठण करण्यात आले व पैगंबर यांची दिलेले शांती प्रेम समता बंधुत्व चा संदेश देण्यात आला
नातं पठण करण्या करीता यवतमाळ जिल्हातील प्रसिद्ध नातं पाठक काझी मोईनोद्दीन अरिफ, मोहम्मद इसाक इंजिनीयर, प्रा.रियाज खान सर, इक्रार रजा व हाफिज गुलाम साहब यांनी नातं पठण करून सभागृहातले वातावरण प्रफुल्लित केले.