काय कराल, आम्हाला मारुन टाकाल का..? चित्रा वाघ मनोज जरांगेंवर कडाडल्या….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडून बसले असून आंदोलन करत आहेत. यादरम्यान ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत.
नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतानाही त्यांनी चिंचुदरी, डुक्कराशी तुलना केली. यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून, आम्हाला मारुन टाकाल का?
“तुम्ही तुमच्या कामासाठी आला आहात, आम्ही तुमच्यासोबत आहात. तुम्ही जेव्हा तुमची पातळी सोडून बोलता तेव्हा आम्ही बोलतो. आम्ही बोलत राहणार. मी काय कोणाला घाबरत नाही. तुम्ही काय आम्हाला मारुन टाकणार आहात? अश्लील फोन येणं, धमक्या देणं…आम्ही नाही कोणाला घाबरत. म्हणजे तुम्ही चुकल्यानंतर तुम्हाला कोणी बोलायचं नाही. तुम्ही ज्या शिव्या शाप देत आहात त्या निमुटपणे ऐकून घ्यायच्या. ऐकून घेणाऱ्यातील आम्ही नाही. तुम्ही तुमचं काम करा आणि आम्ही आमचं करतो”, असं चित्रा वाघ यांनी सुनावलं आहे.
“तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी आला आहात ना. आम्ही, आमच्या सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. हे विरोधी पक्ष आता तोंड घेऊन तिथे येत आहेत त्यांना दिलेलंही टिकवता आलं नाही. त्यांना बोला, त्यांना विचारा. आमचं सरकार तर अजूनही काही करता येईल का याबद्दल सकारात्मक आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून चिमणी, चिचुंदरी आणि डुकराची उपमा दिली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद जाण्याची भीती असल्यानेच अशी विधानं करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच आपण यासंदर्भात निलेश राणेंशी बोललो होतो.
नितेश राणेंचा खळबळजनक दावा
“जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा कार्यक्रम कोणी करत असे तर सरकार म्हणून सगळी माहिती आमच्याकडे आहे. पेट्रोलसाठी पैसे कोण देत आहे. त्या मार्गावर लॉजवर राहण्याची सोय कोण करत आहे या सगळ्याची माहिती आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंकडून प्रत्युत्तर
मनोज जरांगे यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “तुम्ही मराठ्याचे असताना सेवा करायला हवी. जे करतात त्यांची नावं कशाला सांगत आहात. तुम्हाला वाटत असेल मदत करावी तर मग करा ना. मराठे उपाशी मरावेत असं वाटतं का? किती दिवस मराठे असूनही देवेंद्र फडणवीसांचे बूट चाटणार आहात? कधी तरी गरिबांच्या मदतीला या. 96 कुळी मराठा स्वत:ला समजतो, मग कशाला लेंड्या गोळा करत आहात? कोण देतंय याचा काय तपास लावणार आहे. गोरगरिब मराठे वर्गणी काढतात ते खरे 96 कुळी आहेत”.
“मी त्यांना फार दिवसांपासून ओळखतो. मी फक्त त्यांच्या मोठ्या भावाला, दादांना मानतो म्हणून त्यांना यांना बोलायला लावू नका सांगितलं आहे. पण बहुतेक आता त्यांना मंत्रीपद जाण्याची भीती आहे. मी निलेश राणे यांना बोलायला लावू नका सांगितलं होतं. यांना झोडणार असं म्ह़टलं होतं,” असा खुलासा त्यांनी केला आहे.
“कोणी ना कोणीतरी खाऊ घालणारच. पण आम्ही घरुनच सर्व घेऊन गेलो आहोत. जे चोऱ्या करतात त्यांना दुसऱ्यांना चोरी केलं असंच वाटत असतं. इतरांचे कष्टाचे पैसे आहेत. लोकांनी मनाने पेट्रोल, डिझेल, वर्गणी दिल्या आहेत. कोणी देत असेल तर देणाऱ्याचं कौतुक करत तुम्हीही दिलं पाहिजे तर 96 कुळी आहात,” असंही त्यांनी सांगितलं.
“प्रवासात चिमणी गाडीवर धडकली तर बाजूला पडून ओरडते. तसंच ते करत आहेत. त्यांना तशी बोलण्याची सवय लागली आहे. चिचुंदरी लोकांच्या तंगड्यातून पळत असते. तिचं घाबरगुंडीचं कामच असतं,” असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रीपद जाऊ नये यासाठी ते बोलत असून, त्यांचं मंत्रीपद नक्की जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली. डुकराप्रमाणे खाण्याची सवय आहे. 96 कुळींचा एकही गुण त्यांच्यात नाही. असते तर लगेच मराठ्यांच्या सेवेसाठी पोहोचले असते अशी टीकाही त्यांनी केली आहे.
1) मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलन कशासाठी आहे?
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा समाजाला ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गात समाविष्ट करून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण मिळावे यासाठी आहे. ते मराठ्यांना कुणबी जातीचा दर्जा देऊन ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षणाची मागणी करत आहेत.
2) हे आंदोलन कधी आणि कुठे सुरू झाले?
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. हजारो मराठा समर्थक त्यांच्यासोबत मुंबईत दाखल झाले.
3) आंदोलनाची प्रमुख मागणी काय आहे?
मराठा समाजाला ओबीसी गटात समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्रे देणे आणि त्याद्वारे १०% आरक्षण लागू करणे. जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की, ते विद्यमान ओबीसी कोट्यातून हिस्सा घेण्याची मागणी करत नाहीत, तर मराठ्यांचा हक्काचा वाटा मिळावा अशी त्यांची मागणी आहे.