महायुतीच्या मंत्र्याचा जरांगेंना जाहीर पाठिंबा, म्हणाले आरक्षण मिळालेच पाहिजे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती मंत्र्यांचा जरांगेंना पाठिंबा, मराठा आरक्षणाची लढाई अधिक तीव्र
भगवं वादळ मुंबईत दाखल, शिवेंद्रराजेंचा आरक्षणाला जाहीर पाठिंबा
जरांगेंच्या आंदोलनात महायुतीची एंट्री, मंत्री म्हणाले – “आरक्षण मिळालेच पाहिजे”
मराठा आरक्षणाच्या मागणीला राज्यभरातून वाढता पाठिंबा
मराठा समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भगवे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. राज्यभरातून जरांगे पाटील आणि मराठा समजाला पाठिंबा मिळत आहे. विरोधातील आमदार-खासदारांसह आता सत्ताधारी पक्षातील आमदार, मंत्र्यांकडूनही जरांगेंच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला जात आहे. फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच समर्थन आहे. आरक्षण मिळावे अशी भूमिका सुरुवातीपासूनच होती, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासूनच माझं समर्थन आहे. आजसुद्धा आहे. आरक्षण मिळाले पाहिजे. कायम राहणार आहे. शेवटी आऱक्षण मिळाले पाहिजे, गरजू मराठा समजातील लोकं आहेत, त्यांना आरक्षण मिळावे ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल झाले आहे. जरांगेंच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावातून पाठींबा मिळत आहे. मुंबईमध्ये जिकडे तिकडे भगवं वादळ घोंघावत आहे. आझाद मैदाना मराठ्यांनी पूर्णपणे भरले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये जल्लोषात आणि जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील आंदोलनात सहभागी होणार आहेत. अटी-शर्थीसह मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ‘भगवं वादळ’ मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईतील आझाद मैदान मराठा समाजाने गजबजला आहे, जिकडे तिकडे भगवे झेंडे दिसत आहेत. राज्यभरातील अनेक आमदार-खासदारांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. सत्ताधारी महायुतीतील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं असे म्हणत जाहीर पाठिंबा दिला आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे”अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.