अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, दिल्लीत घडामोडी वाढल्या…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे.भारतातूनआयातहोणाऱ्या वस्तूंवर अमेरिका 25 टक्के नियमित आणि अतिरिक्त 25 टक्के असं एकूण 50 टक्के शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी 6.30 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मलासीतारामन यांच्यासह इतर 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ संदर्भात आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्या आजपासूनसुरुहोणाऱ्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याबाबत चर्चा होऊ शकते. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले असताना भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यत आहे.
अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर 1 ऑगस्टपूर्वी25 टक्के टॅरिफ लागू केलं होतं. त्यानंतर त्यामध्ये 25 टक्क्यांची वाढ केली आहे. भारतातून आयातहोणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेनं50 टक्के आयात शुल्क 27 ऑगस्टपासूनआकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊन 40 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
भारत आणि अमेरिका यांच्यातीलद्विपक्षीय व्यापार करार देखील लांबणीवर पडला आहे. सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी वॉशिंग्टनची एक टीम भारताच्या दौऱ्यावर येणार होती. 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान ही चर्चा होणार होती. मात्र, हा दौरा लांबणीवर गेला आहे.
अमेरिका व्यापारी कराराच्या माध्यमातून कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करत आहे. भारतानं अमेरिकेच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळंभारतानंयेत्या काळात स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना आवाहन केलं होतं.
भारताकडून रशियाकडून तेल खरेदी कायम
अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदी आणि शस्त्र खरेदी करत असल्यानं 25 टक्के टॅरिफ लादत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांनी वाढवलं. दरम्यानच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात चर्चा झाली. या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं आहे. एकीकडे अमेरिका भारतावर टॅरिफ वाढवत असताना भारत आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा सुधारत असल्याचं चित्र आहे.