राज्यात पुढील 24 तास महत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट; अतिमुसळधार पाऊस झोडपणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासह अन्य जिल्ह्यांत तुफान पाऊस होत आहे.
आता आणखी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा नवा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. आज सकाळीही पाऊस होतच आहे. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात पावसाचीही हजेरी राहिल असा अंदाज दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी (Red Alert) करण्यात आला आहे. पालघर ठाणे आणि मुंबईसाठी शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आता उद्यापासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रायगडात अतिवृष्टी तर पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार
राज्यात पुढील 24 तासांत कोकणात अतिमुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. घाट माथ्यावर मात्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून अन्य जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे. आताही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तासांत अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..