उपराष्ट्रपती निवडणूक रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार ; २१ तारखेला अर्ज भरणार..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “जगदीप धनखड यांनी अचानकपणे दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. जगदीप धडखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला.
जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या रिक्तपदासाठी ०९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असेल, याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा संसदीय मंडळाची रविवारी बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराचे नाव निश्चित करतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबत माहिती दिली होती.
अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी रविवारी एनडीएकडून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्च देवव्रत यांना भाजपाकडून संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंग, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..