महसूल मंत्र्याच्या समक्ष गौतमी पाटील यांच्या बहारदार नृत्य मध्ये होणाऱ्या दही हंडीशी माझा काही संबंध नाही :- आमदार किसनराव वानखेडे….
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- 21 ऑगस्ट रोजी उमरखेड येथे होणाऱ्या दहीहंडी मध्ये मराठी नटी सुप्रसिद्ध लावणी कलाकार यांच्या कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दही हंडी फोडल्या जाणार ही दहीहंडी लाख 2 लाख नाहीतर 11 लाखाची आहे परंतु अकरा हजार रुपये मागील पंधरा वर्षात भाजपाच्या कार्यकाळात एकही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शिस्तीच्या पक्षाकडून दिल्या गेले नाहीत हा विषय चर्चेला जात आहे मागील वर्षी दहीहंडी कार्यक्रमांमध्ये एका नागरिकाला अपंगत्व स्वीकारावे लागले. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितीती इतक्या मोठ्या प्रमाणात होती की शेवटी चेंगराचेंगरी झाली यामध्ये एका तरुणाला आपले पाय गमावे लागले.याही वर्षी म्हणजेच 21 ऑगस्ट 2025 रोजी उमरखेड येथे विद्यमान आमदार यांच्या पक्षाकडून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री संजय राठोड सह अनेक पक्षातील कार्यकर्ते, राज्याच्या सत्तेतील सरकारमधील आमदार खासदार तथा मंत्र्यांची उपस्थिती या जिल्ह्यासाठी आकर्षण ठरली आहे.या जिल्ह्यात शेतकरी यांचे समस्याने थैमान घातले आहे.वीज पडून शेतकरी शेतमजूर तथा पाळीव प्राण्यांचा शेकडोच्या प्रमाणात जीव गेला आहे. तालुक्यातील वेणी धरण या ठिकाणी अनेक जनावरे धरणामध्ये वीज पडून मृत पावली परंतु या बाबीकडे सत्तेतील पक्षाचा शेतकऱ्यांचे मंत्री असलेले महसूल मंत्री यांनी याकडे विशेष दुर्लक्ष केले खरे तर उमरखेड महागाव विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत या समस्यांकडे विद्यमान आमदार सत्तेतील नेते म्हणून मिरवणारे “भाऊ”नी कोणतेही लक्ष दिले नाही. ज्या ठिकाणी विद्यमान आमदारांचा दौरा होतो त्या ठिकाणी शेतकरी आपली कैफियत मांडतात परंतु ज्या जनतेने शेतकरी शेतमजुरांनी ज्यांना निवडून दिले तेच त्यांच्यावर रागावतात असे अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर या अगोदर प्रसारित झाले आहे. खरे तर या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल मंत्र्यांनी यावे ही रास्त अपेक्षा! या मतदार संघातील शेतकऱ्यांची शेतमजुरांची समस्या सोडविण्यासाठी येणे अपेक्षित होते परंतु महसूल मंत्री दहीहंडीच्या कार्यक्रमाला येणार असल्याचे पॉम्पलेट नुकतेच सत्तेतील पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आले आहे.त्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांची फोटो हँडबील मध्ये आहे तसेच शेजारील आमदार खासदार सुद्धा या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावणार असल्याचे सध्या सोशल मीडियावर फिरून शेतकऱ्यांच्या मोबाईलच्या हाती जात आहेत.कधीकाळी या मतदारसंघांमध्ये शेतकरी सुजलाम सुफलाम होता परंतु महसूल मंत्री उमरखेडच्या दहीहंडीला उपस्थित राहणार हा जनतेमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या छातीवर मुंग दळून गौतमीचा नाच होणार आहे त्या नाचामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहे.
या जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघांमधील आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री प्रा. अशोक उईके यांची उपस्थिती सुद्धा राहणार आहे तथा सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या समक्ष अनेक खासदार आणि आमदार या मतदारसंघात गौतमीच्या छम छम छम कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बॅनर विद्यमान आमदाराच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे विधानसभेमधील पोलीस महसूल कृषी वनविभाग सह अनेक खात्यामध्ये त्या त्या कार्यालयातील प्रमुखांना याबाबत विचारले असता आम्ही खूप काही केले या दहीहंडीसाठी आर्थिक नियोजन परंतु आम्ही समोर येऊन सांगू शकत नाही अशी खंत “पॉलिटिक्स स्पेशल” जवळ व्यक्त केली शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दहीहंडी आणि गौतमी यांचे नृत्य हा विषय सामान्य शेतकरी शेतमजूर यांना काही पचनी पडणे झाला तरीही यावर आमचे काही चालत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी शेतमजुराकडून खुलेआम बोलल्या जात आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कैवारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरखेड विधानसभेकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण या मतदारसंघांमध्ये त्यांच्या सत्तेतील पक्षाचे आमदार आहे त्याच मतदारसंघांमध्ये एखादी मराठी नाट्य आणून शेतकऱ्यांचे उरावर नाचविले जात असेल तर देवा भाऊंची या विधानसभेमध्ये काय किंमत राहील हा विषय शेतकरी शेतमजूर जनतेमध्ये चर्चिल्या जात आहे.
पॉलिटिक्स स्पेशल यांनी आमदार किशनराव वानखेडे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की माझं काय गरीब माणसाचे काय? हा कार्यक्रम भाऊ यांनी त्यांचे कार्यकर्ते यांचे साठी ठेवला गौतमी पाटील यांचे बहारदार नृत्य मध्ये होणारे दही हंडीशी माझा संबंध नाही आणि माझा काही विषय नाही अशी प्रतिकिया दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..