बच्चू कडूंना तीन महिने कारावासाची शिक्षा, काय आहे प्रकरण..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना 2018 साली घडलेल्या प्रकारात अडथळा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण तब्बल सात वर्षांपूर्वीचे असून न्यायालयाने कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२०१८ च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी ठरले.
कर्मचाऱ्याला धमकी आणि अडथळा निर्माण करण्याचा आरोप सिद्ध.
मुंबई हायकोर्टाने ३ महिन्यांची शिक्षा व १० हजार दंड ठोठावला.
प्रहार संघटनेच्या प्रमुखांवर सात वर्षांपूर्वीचे प्रकरण.