तर आम्ही पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवत घरात घुसून मारू; नवनीत राणांना येणाऱ्या धमकी प्रकरणावर रवी राणांचा इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांनावारंवारयेणाऱ्याधमक्याआणिसमाजमाध्यमांवरीलशिवीगाळप्रकरणावरून अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभेचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) चांगलेच आक्रमक झाले आहे . यानंतर राज्यातील महिलांना धमकी आल्यास पो ली स आणि कायदा सु व्यवस्था बाजूला ठेवून युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते घरात घुसून मारल्याशिवाय सोडणार नाही.
असाधमकीवजाइशारा रवी राणांनीदिलाआहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यात 8 लोक सहभागी असूनयातीलमुख्यआरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशमधून अटक केली आहे. याप्रकरणी रवी राणा यांनी पोलिसांचं देखील कौतुक केलंआहे. मात्रइथूनपुढेआम्हीअसेप्रकारसहनकरणारनसल्याचानिर्वाणीचाइशाराहित्यांनीदिलाआहे.
नेमकं काय म्हणाले रवी राणा?
तीन दिवसाआधी इसा नामक एका व्यक्तीने मुस्लिम समाजाचं नाव खराब केलं आहे. ज्या देशात महिलेला मातेचे स्थान देण्यात येतं तिथे महिलांबद्दल असभ्य वर्तन करत अश्लील शिवीगाळ केली. सर तन से जुदा अशा आशयाची धमकी नवनीत राणा यांना दिली आहे. यासह गलिच्छ भाषेचा वापर केलाय. याप्रकरणी असा नामक व्यक्तीसह सहा ते सात अजून आरोपी आहेत. त्यामुळे समाजाने त्यांना आवर घालावा. अन्यथा कायदा व्यवस्था बाजूला राहील आणि आम्ही यांना घरात घुसून मारू. म्हणून आज आम्ही कायद्याची भाषा बोलत आहे. मात्रयापुढे जाऊन जर असा प्रकार झाला आणि यामध्ये राज्यात कुठेही महिलांबद्दल असा प्रकार घडल्याचे दिसून आलं तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक आमच्यात आहे. असा निर्वाणीचा इशारा देखील रवी राणा यांनी दिला आहे.
नवनीत राणांच्या हत्येचा कट रचला
पोलिसांनी या प्रकरणात चांगल्या प्रकारे कारवाई केली, यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाचे अभिनंदन करेल. या व्यक्तीला मध्यप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. अमरावती पोलीस आणि क्राइम ब्रांचच्या मदतीने चार जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आठ आरोपी आहेत. यांनीच नवनीत राणांच्या हत्येचा कट रचला होता. या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यात चर्चा झाली. मात्र पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. असे असले तरी पुन्हा जर असं कोणी धाडस केलं तर युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता अशांना घरात घुसून मारेल, अशी धमकी वजा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला.