‘ एन -95 ‘ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
‘एन-95’ मास्क किंवा अन्य कोणतेही मास्क असो एका ठराविक किंमतीत ते विकले गेले पाहिजे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. याबाबत ४ दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोव्हिड रुग्णालयाचे उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या रुग्णालयातील १० बेड हे अतिदक्षता विभागात आहेत. २० बेडचा जनरल वॉर्ड असणार आहे. या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत आणि खास सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत.
या रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरकडून कोविड रुग्णांवर अद्यावत उपचार केले जाणार आहेत.
सांगली जिल्ह्यात सर्वात अगोदर, इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील २५ लोक कोरोना बाधित झाले होते. मात्र, सर्व रुग्ण करोनामुक्त झाले. इस्लामपूर पॅटर्नमुळे इस्लामपूर कोरोनामुक्त झाले होते. त्याच इस्लामपूरमध्ये वाळवा आणि शिराळा तालुक्यासाठी अद्यावत रुग्णालयात सुरु केले आहे.
दरम्यान, शासकीय डॉक्टर बरोबरच, खासगी डॉक्टर यांना सुद्धा विमा सुरक्षा कवच आहे. आयएमएची मागणी मान्य केली आहे. खासगी डॉक्टर यांनीही आणखी जास्त रुग्णसेवेसाठी पुढे यावे, असं मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं