निवडणूक आयोगाकडून ‘मतांची चोरी’; राहुल गांधी यांचा आरोप, ‘अणुबॉम्ब’प्रमाणे पुरावे असल्याचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करीत असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. तसेच पुरावे असल्याचा दावा करीत त्यांनी पुराव्यांची तुलना ‘अणुबॉम्ब’शी केली.
ज्या वेळी याचा स्फोट होईल त्या वेळी निवडणूक आयोगाला देशात लपण्यासाठीही जागा राहणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी देशद्रोह केला असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील राहुल गांधी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिला.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहारसाठी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली. बिहारमध्ये मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा हेतू असल्याचा आरोप करून, विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष सखोल फेरनिरीक्षणच्या (एसआयआर) मुद्द्यावर चर्चेची मागणी करीत आहे.
आरोपांकडे दुर्लक्ष करा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले ‘मतचोरी’चे आरोप निराधार असून अशा ‘बेजबाबदार’ टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी म्हटले. तसेच दररोज मिळणाऱ्या धमक्यांना न जुमानता निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, असेही आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेसला २०२३ च्या मध्य प्रदेशातील निवडणुकीत त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनियमिततेचा संशय होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मतदार जोडण्यात आले. आम्हाला वाटते की, राज्य पातळीवर (महाराष्ट्रात) मतांची चोरी झाली आहे. आम्ही चौकशी सुरू केली. त्यास सहा महिने लागले. आम्हाला जे आढळले तो अणुबॉम्ब आहे. स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोगाला देशात लपण्यासाठीही जागा मिळणार नाही. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
पाण्यासारखे वाहा, बॉम्बसारखे फुटू नका. त्यांनी जर बॉम्ब फोडला तर तर आम्ही संविधान वाचवू. त्यांचे काम स्फोट करणे आहे. त्यांना दुसरे काही करायचे नाही. विरोधी पक्ष लोकशाहीवर विश्वास नसल्यामुळे असे बोलतात. राहुल गांधी यांची भाषाच अशोभनीय आहे. – संबित पात्रा, प्रवक्ते, भाजप

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..