आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन
पॉलिटिक्स पेशल लाईव्ह
पुसद
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांचा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून गौरव केला जातो. नाईक साहेबांनी महाराष्ट्राचे नेतृत्व अकरा वर्षाहून अधिक काळ केले. महाराष्ट्र राज्याला राजकीय स्थैर्य मिळवून दिले त्यामुळे शेती व सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडी मिळवता आली याला शुगर लॉबी असे नामाभिधान दिले आहे .या शुगर लॉबीची निर्मिती नाईक साहेबांचे काळात झाली. तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते पाटील यांनी सहकार क्षेत्राची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कृषी औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आले. कृषी-औद्योगिक प्रकल्पाची उभारणी झाल्यामुळे विशेषत: दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला.विदर्भ- मराठवाड्यातही कृषी-औद्योगिक प्रकल्पाची उभारणी नाईक साहेबांनी केली परंतु विदर्भात पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सहकार क्षेत्राची प्रगती होऊ शकली नाही.
महाराष्ट्राला रोजगार हमी योजना, एकाधिकार कापूस खरेदी योजना, शासकीय धान्य खरेदी योजना अशा योजना राबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला अशा या महानायकांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पॉलिटिक्स स्पेशल चे विनम्र अभिवादन.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….