हरिभक्त परायण नरहरी महाराज वेणीकर यांचे निधन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद,
श्री संत ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध प्रवचनकार व स्वाध्याय भवनाचे मार्गदर्शक हरिभक्त परायण नरहरी महाराज वेणीकर यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी मिराबाई व भक्तांचा मोठा गोतावळा आहे. त्यांचे मूळ गाव वेणी खुर्द असून गेल्या ४५ वर्षांपासून पूस नदीच्या तीरावर ‘भावार्थ दीपिका’ स्वाध्याय भवनात त्यांनी संत ज्ञानेश्वरीवर सातत्याने विद्वतप्रचुर प्रवचन केले. अतिशय साध्या ,सोप्या शब्दात त्यांनी ज्ञानेश्वरीचे मर्म भाविक भक्तांना प्रवचनातून शिकविले. अध्यात्म व विज्ञानाची जोड देत त्यांनी आपल्या प्रवचनातून उद्यमशीलवृत्तीला प्रोत्साहित केले.
त्यांचे पुसद व सभोवतीच्या परिसरात असंख्य भक्त असून त्यांनी संतांच्या विचारांना आपल्या कीर्तन प्रवचनातून लोकांपर्यंत पोहचवुन समाज प्रबोधन केले. ते स्वतः केवळ दुसऱ्या वर्गापर्यंत शिकले होते. मात्र, त्यांनी प्रचंड वाचन व अभ्यासातून संत ज्ञानेश्वरीवर प्रभावीपणे अनेक वर्षापर्यंत भाष्य केले.त्यांचा सर्वच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास असल्याने त्यांच्या ओघवत्या प्रवचन शैलीतून त्यांनी अध्यात्माचा सोप्या शब्दात उलगडा केला. त्यांच्या निधनाने पुसद परिसराचे अध्यात्मिक वैभव हरविले. नरहरी महाराज यांच्या निधनामुळे त्यांचे भक्त शोक सागरात बुडाले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….