शाळा कधी सुरु होणार ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली मोठी माहिती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचना आल्यानंतरच राज्यातील शााळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांचेे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य सरकार मात्र प्रयत्नशील आहे, असं मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाच्या काळात शाळा सुरु करण्याचा निर्णय अमेरिकेच्या सरकारनं घेतला होता. मात्र यादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनावर पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे. या बाबीचा विचार करता केंद्राकडून जोपर्यंत शाळा सुरु करण्यास सांगण्यात येत नाही तोपर्यंत राज्यातील शाळाही बंदच ठेवण्यात येतील, असंही गायकवाड यांनी यावेळेस सांगितलं आहे.
तसेच पालक व विद्यार्थी संस्थांनीही शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिळून शाळा सुरु करायच्या की नाहीत याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहेे.
कोरोनाच्या काळात मुलांवरती प्रचंड मानसिक ताण असू शकतो. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष महत्वाचं असल्यानं शिक्षकांनी मुलांवरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. साधा फोन कॉल करुनही विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होऊ शकतो, असा सल्लाही वर्षा गायकवाड यांनी यावेळेस दिला आहे.