मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत ?, मी सरकारशी बोलतो – राज ठाकरे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई | राज्यातील मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलं. या प्रकरणावर मी सरकारशी बोलेन, असंही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितलं.
राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्र्यंबक पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, संतोष धुरी उपस्थित होते.
‘धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय?
त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?’, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे फेब्रुवारीपासून बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात सध्या टाळेबंदीमध्ये शिथीलता आणण्यात येत आहे. याच शिथीलतेमध्ये मंदिरांना देखील सूट देण्यात यावी, अशी मागणी आता होताना दिसून येत आहे, गेले अनेक भाजपचे नेते आमदार तसंच शनिवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील मंदिरं खुली करण्याची मागणी ट्विट करून केली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….