‘उबाठा’ म्हणजे सत्तेसाठी लाचार झालेला पक्ष :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जनतेने उबाठाला केव्हांच टाटा बायबाय केले आहे. इतर पक्षातील नेत्यांना शिवसेनेत यायचे आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेसच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली बसला.
सत्तेसाठी लाचार कोण झाले हे जनतेला माहिती आहे. बाळासाहेब असते तर सत्तेसाठी लाचारांना मिरचीची धूर दिला असता. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानेच त्यांची ही परिस्थिती झाली आहे. निवडणूका आल्यावर यांना मराठी माणूस आठवेल, मराठी माणसांच्या नावाने गळा आवळतील. पण मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील. अशl शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा वरळी येथे पार पडला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यावर कडाडून टीका केली. पुढे ते म्हणाले की हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचारांचा असलेल्यांचा आहे. ८० टक्के समाजकारण म्हणजे, शिवसेनेचे धनुष्यबाण आमच्याकडे, जनतेचा आशिर्वाद आमच्याकडे, शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. २०२४ मध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. असेही त्यांनी सांगितले.
तुमचे हिंदूत्व हे सोयीचे
पुढे त्यांनी उबाठावर टीका करताना म्हटले की पाकिस्तानचे झेंडे का मिरवता, बॉम्बस्फोटातील आरोपी तुमच्या रॅलीत का मिरवतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसता. गरज असेल तेव्हा हिंदुत्वाचा आधार घ्यायचा व इतर वेळी सोडून द्यायचे, या धरसोड वृत्तीमुळे तुम्हाला गेल्या विधानसभेत जनतेने जागा दाखवली, राम भक्तांना हरामखोर म्हणनारे कोण, हनुमान चालिसा म्हणनाऱ्यांना जेलमध्ये कोणी टाकले, यावेळी तुमचे हिंदूत्व कुठे गेले होते. असा सवाल शिंदे यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..