पंतप्रधानांनी केली Health ID Card ची घोषणा ,वाचा सामान्यांचा काय होणार फायदा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना संदर्भात भाष्य केले. सारखेच हे कार्ड असणार आहे. पंतप्रधानी घोषणा केलेल्या ‘नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन’ या अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार केले जाणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यासंदर्भातील सर्व माहिती या प्लॅटफॉर्मवर असणार आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीवर कोणते उपचार झाले आहेत, निदान काय आहे, कोणत्या उपचारांची आवश्यकता आहे यांसारखे डिटेल्स या कार्डमध्ये असतील.
आजपासून या मिशनची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आ़यडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल.
या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारीत पद्धतीने विचार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हेल्थ आयडी प्रत्येक भारतीयाच्या स्वास्थ्य खात्याप्रमाणे काम करेल. यातून अनेक उपचारासंबंधित समस्या सोडवल्या जातील.

देशातील नागरिकांना हे स्वास्थ्य कार्ड बनवावे लागेल. याअंतर्गत होणारे उपचार आणि विविध चाचण्याची माहिती डिजिटली सेव्ह केली जाईल. याचा संपू्ण रेकॉर्ड ठेवला जाईल. यामुळे असा फायदा होईल की देशातील कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचारासाठी गेल्यास तुम्हाला सर्व रिपोर्ट किंवा जुन्या टेस्टचे रिपोर्ट नेण्याची आवश्यकता नाही. तुमच्या युनिक आयडीच्या माध्यमातून डॉक्टरांना याबाबत माहिती मिळेल.

याप्रकारे काम करेल हेल्थ आयडी
प्रत्येक व्यक्तीचा मेडिकल डेटा ठेवण्यासाठी रग्णालय, क्लिनिक, डॉक्टर हे एका सेंट्र सर्व्हरशी जोडले जातील. या अभियानाशी जोडले जाणे हे त्या रुग्णालयावर आणि संबंधित व्यक्तीवर अवलंबून असेल. प्रत्येक नागरिकाचा आयडी युनिक असेल. त्यावरच लॉग इन केल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…