बोगस खत विक्री प्रकरणी कारवाई करा, अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी आणला नोटांचा हार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- “बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने २० जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नाही. जेथे मिळते तेथे अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करावे लागत आहे. हिंगोली शहरात गोदावरी कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी १९ जून रोजी छापा टाकला. यामध्ये डीएपी खत बनावट असल्याच्या संशय आल्याने अधिकाऱ्यांनी संबंधित गोदामाला सील ठोकले आहे. तसेच यात गुन्हाही नोंद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात शुक्रवारी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, किसान भारती निर्माण फर्टीलायझर या नावाने बोबस एसएसपी खताची विक्री होत आहे. यावर तत्काळ नमूने घेऊन कार्यवाही करावी, इ-पॉस मशीनद्वारे खताची विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण मते, रामेश्वर कावरखे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कृषी विभाग तसेच विक्रेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. संतप्त पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार तयार करून आणला होता.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
दरम्यान, क्रातीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याची भूमिका घेतली हेाती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….