ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी विविध योजना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.20 :- ओबीसी प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाकरिता शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते. महामंडळाच्या योजना खालीलप्रमाणे आहे.
20 टक्के बीज भांडवल योजना : ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के आहे. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा 5 लाख इतकी आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
थेट कर्ज योजना : ही योजना महामंडळामार्फत राबविली जाते. यामध्ये महत्तम कर्ज मर्यादा 1 लाख असून परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे. या योजनेत शेतीला पुरक किंवा इतर छोट्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते. परतफेडीचा कालावधी 4 वर्षे असून नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही, परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर वार्षिक 4 टक्के व्याज दर आकारण्यात येते. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष पर्यंत असावे. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धीकरीता राष्ट्रीयकृत बँक तसेच सहकारी बँकेमार्फत राबविली जाते. व्यवसायाकरिता मागणीनुसार 1 ते 15 लक्ष पर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत 12 टक्के पर्यंत व्याज परतावा अनुदान स्वरुपात देण्यात येते. लाभार्थ्याने कर्जासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना : ही योजना उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता राबविली जाते. याअंतर्गत 10 ते 20 लाखापर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते. बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत 12 टक्के पर्यंत व्याज परतावा अनुदान स्वरुपात दिला जातो. या विद्यार्थी बारावी मध्ये 60 टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्याचे वय वय 17 ते 30 दरम्यानचे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लक्ष पर्यंत असावे.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना : ही योजना इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यासाठी राबविली जाते. राज्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लक्ष पर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12 टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी महिला इतर मागास प्रवर्गातील व राज्याचीची रहिवाशी असावी, वय 18 ते 60 वर्ष असावे. बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रात केलेली असावी.
महामंडळाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, यवतमाळ येथे तसेच महामंडळाच्या www.msobcfdc.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….