अखेर उच्च न्यायालयाचा ग्रामपंचायत प्रशासकाबाबत मोठा निर्णय ; राज्य सरकारला झटका!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी कोण असेलं याबाबत महाराष्ट्र राज्यात वाद चालू आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं या वादावर पडदा टाकत आपला अंतरिम आदेश दिला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी योग्य व्यक्ती नव्हे तर सरकारी अधिकारी नेमावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ग्रामपंचायत प्रशासकाबाबतच्या या निर्णयामुळे ठाकरे सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे. या ग्रामपंचायतींवर आता न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची खात्री पटली आहे.ग्रामविकास विभागाकडून प्रशासकपदी योग्य व्यक्ती निवडण्यात यावा, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीन डझन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर या याचिकांना बगल देण्यासाठी राज्य सरकारनं राजपत्र सिद्ध केलं होतं. मात्र, राजपत्रालाही न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमनुकीबाबत न्यायालयानं 27 जुलै आणि 14 ऑगस्ट रोजी अंतरिम आदेश सुनावले आहेत. यानंतरची सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..