आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिलं ते पटलं नाही, माजी शिलेदाराने आता डागली तोफ, अजून काय केले आरोप?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात पाच वर्षांपूर्वी राजकारणात वेगळाच प्रयोग झाला होता. महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत वाटेकरी झाली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाले, तर आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात कॅबिनेटची माळ पडली होती.
राज्यातील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चा ही झाली होती. राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याचा दावा होता. आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने नेमका तोच धागा पकडून आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यायला नको होतं असा सूर आळवला आहे.
2009 पासून आदित्य ठाकरे सक्रिय
आदित्य ठाकरे यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. मातोश्री हेच राजकीय केंद्र असल्याने त्यांचा राजकीय प्रवास तसा बालपणापासूनच झाला. सिनेटपासून अनेक निवडणुकीचा त्यांनी अगोदर अनुभव घेतला. 2009 मध्ये पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून त्यांना आमदारकी लढवण्याची संधी मिळाली . तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती.
भरत गोगावलेंची नाराजी
आदित्य ठाकरे यांना त्यावेळी शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. त्यावर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते, असे मत गोगावले यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा, असा आरोप गोगावले यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..