महागाव पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव ; रॅपिट अँटीजन टेस्ट मध्ये आला शिपाई पॉझिटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
कोरोना योद्धा म्हणून चोविस तास इमान इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस शिपायाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे महागाव पोलिस स्टेशन पर्यंत कोरोना पोहोचल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग होऊ नये म्हणून चोविस तास रस्त्यावर राहून पोलिस कोरोना योद्ध्याची भूमिका निभावत आहेत. परंतू कर्तव्य बजावत असताना नजर चुकीने कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे महागाव पो.स्टेमधील एका पोलीस शिपायास कोरोनाचा (ता.१३) संसर्ग झाला. तालुका नियंत्रण समितीने रॅपिड अँटीजेन टेस्ट द्वारे लोकांच्या संपर्कात येणारे व्यावसायिक,पत्रकार, डॉक्टर्स,आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याची मोहिम हाती घेतली. यात महागाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या एका शिपायाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या शिपायाच्या संपर्कात आणखी कोणकोणते कर्मचारी आले होते याची चौकशी करण्यात येत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….