ठाकरे बंधू एकत्र येणार..? उद्धव ठाकरेंचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच, आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, तर उद्धव ठाकरे यांनी देखील युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
त्यानंतर मुंबईसह कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांना अत्यंत आनंद झाला आहे. हे दोन्ही बंधू एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या सैनिकांची इच्छा आहे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते. ठाकरे हा ब्रँड काय आहे, हे महाराष्ट्राला दिसून येईल अशा शब्दात शिवसैनिक आणि मनसैनिक मनातील इच्छा बोलून दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यावर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात जोडत, आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढू आणि जिंकू असे म्हटले.
उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील, मी कशी प्रतिक्रिया देणारं, माझा काय संबंध येतो. यांनी साथ द्यायची आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिला, त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण, काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला काय आहे, असं मला वाटत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो असेही फडणवीसांनी म्हटलं.
लोकं विकास बघतात, लोकं आमच्यासोबत – लोढा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल, ‘सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ’ अशी डायलॉगबाजी करत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमुळे काय फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केलं. मनसे आणि शिवसेना एक होऊ द्या ना, पण लोकं विकास बघतात. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास बघतात. त्यामुळे लोक आमच्याबरोबर आहेत. भाजप हा स्वतःला राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणतो, राष्ट्राचे नियम आणि सिद्धांत आहे, त्याप्रमाणे आम्ही चालणार असे उत्तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
मुख्यमंत्री गडचिरोलीत, युनिटला अत्याधुनिक शस्त्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली पोलिसांच्या सी. सिक्सटी युनिटला रशियन बनावटीचे अत्याधुनिक शस्त्र देण्यात आले आहे. 172 असॉल्ट रायफल, 19 मशीन पिस्टल आणि भारतीय बनावटीच्या 300 खास बुलेटप्रूफ जॅकेट्स सी 60 च्या जवानांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक शस्त्रांमुळे गडचिरोली पोलिसांच्या सर्वात यशस्वी अशा C-60 युनिटची मार्क क्षमता आणखी वाढणार असून जंगलातील त्यांचे ऑपरेशन्स आणखी अचूक होतील, अशी अपेक्षा आहे.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….