आधीच्या पालकमंत्र्यांनी दारुची दुकानं उघडली तर आत्ताचे पालकमंत्री संजय शिरसाटांनी जमीन घेतली :- इम्तियाज जलील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आधीच्या पालकमंत्र्यांनी दारुची दुकाने उघडली, आत्ताचे पालकमंत्री संजय शिरसाटयांनी शेंद्रायेथे जमीन घेतल्याचे मत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले .
त्यांच्या मुलाला ही जमीन देण्यात आली असून MIDC कडून ही जमीन देण्यात आली आहे. दारु कंपनीसाठी ही जागा घेतली आहे.
6 कोटी 9 लाख 4 हजार 200 रुपयांमध्ये ही जमिन घेतली आहे. ही जागा MIDC साठी राखीव होती. पण त्यावरील आरक्षण काढून शिरसाट यांना जमीन देण्यात आली आहे. ट्रक पार्कींगसाठी ही जागा राखीव होती. येथील MIDC ने वरती प्रस्ताव पाठवला की ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या जागेवरील राखीव आरक्षण काढायचे आहे. सिद्धांत शिरसाट यांना ही जागा दयायचे ठरल्याचे जलील म्हणाले. 200 ते 300 ट्रक याठिकाणी पार्किंग होणार होते. पण 70 ते 80 ट्रक पार्क होतील असे कारण देऊन राखीव जागेवरील आरक्षण उठवलं आहे. ऑगस्टमध्ये हा निर्णय झाला आहे, जेवढ्या जागेवरील आरक्षण काढले तेवढीच जागा शिरसाट यांना देण्यात आल्याचे जलील म्हणाले. संजय शिरसाट यांच्या मुलाचे प्रकरण गाजत आहे. त्यावर विट्स हॉटेल लिलावमधून आपला मुलगा माघार घेत असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. तसेच आपल्यासाठी हा विषय संपला असल्याचे देखील ते म्हणाले.
105 कोटी 89 लाख रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. 26 कोटी रुपये यासाठी भरणार असल्याचे सिध्दांत यांनी दिलेल्या कागदावर उल्लेख केला आहे. सिध्दांत शिरसाट, विजया शिरसाट, बिल्डर भावे अमीन हे कंपनीत डायरेक्टर आहेत. कागदोपत्री पैसे दाखवण्यासाठी भावे यांना सोबत घेतलं, पुढे काम झाल्यावर भावे बाहेर पडल्याचे जलील म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवरुन सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या लिलावात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांना उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ‘माझ्या मुलाने या हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतला, पण लिलाव प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तरीही भ्रष्टाचाराच्या आरोपांचं खोटं चित्र उभं केलं जात आहे. त्यामुळे मी मुलाला या प्रक्रियेतून माघार घेण्यास सांगणार आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘तुम्ही जर खरोखरच इतके प्रामाणिक आहात, तर हे हॉटेल विकत घेऊन दाखवा. मी तुमच्या स्वागतासाठी स्वतः हजर राहीन.’ असे थेट आव्हान शिरसाट यांनी विरोधकांना दिलं आहे.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….