ठाकरे गटाचे ५ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ठाकरे गटाचे ५ खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंना मोठा धक्का देण्याची रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.
पाच खासदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्यास ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे ५ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे ठाकरे गटाकडून आऊट गोइंग थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्षांतर बंदीचा फटका बसू नये, यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला एका खासदाराची गरज आहे. यासाठी शिंदे सेना लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून चालवण्यात येणारं ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ऑपरेशन टायगर पावसाळी अधिवेशाआधीच पूर्ण होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेकडून आऊट गोईंग थांबवण्याचेही प्रयत्न सुरु झाले आहेत. शिंदेंच्या सेनेला एका खासदाराची गरज आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेने ठाकरेंच्या खासदारांना संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचं सांगण्यात येत आहे.
शिंदे सेनेकडून लवकरच हे ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे सेनेने सुरु केलेलं ऑपरेशन टायगर हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पूर्ण झाल्यास उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोणते प्रयत्न केले जातात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….