१२ माओवाद्यांनी शस्त्र टाकले, मुख्यमंत्र्यांनी हाती संविधान सोपविले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माओवादी चळवळीतील अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या १२ माओवाद्यांनी ६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यावेळी दोन सशस्त्र महिला माओवाद्यांनी गणवेशात मुख्यमंत्र्यांसमोर एंट्री केली.
नम्रपणे शस्त्रे बहाल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे कौतुक करत हाती संविधान सोपविले. अशा प्रकारे आत्मसर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.
पोलिस मुख्यालयावरील सभागृहात हा सोहळा झाला. आत्समर्पण केलेल्या १२ माओवाद्यांवर एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षीसे होती. डीव्हीसीएम सपनाक्का (दंडकारण्य स्पेशल स्पेशन झोनल कमिटी सदस्य गीरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह डीव्हीसीएम दर्जाचे चार वरिष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एरिया कमिटी मेंबर व एक सदस्य यांचा यात समावेश आहे.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी माओवादविरुध्दच्या कारवायांसोबतच कम्युनिटी पोलिसिंगबद्दल तपशीलवार माहिती दिली.
जवानाच्या तोंडून ऐकला थरारक प्रसंग
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध माओवादी चळवळीत निडरपणे योगदान देणाऱ्या अधिकारी व सी- ६० जवानांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. कवंडे (ता. भामरागड) येथे भरपावसात छत्तीसगड सीमेलगतच्या इंद्रावदी नदीकाठी जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले होते. चकमकीत चार माओवाद्यांचा खात्मा केला होता. या अभियानाचा थरारक प्रसंग सी- ६० चे सहायक उपनिरीक्षक महादेव मडावी यांनी मुख्यमंत्र्यांपुढे उलगडला. जवानांनी कठीण परिस्थितीत राबविलेल्या मोहिमेची कथा ऐकून मुख्यमंत्री क्षणभर चकित झाले, आपल्या भाषणात त्यांनी आज कवंडे येथे भेट दिली असता माओवादी ज्या बेटावर लपून बसले होते, त्याची पाहणी केली. डोक्याएवढ्या पाण्यातून वाट काढत जवानांनी राबविलेले हे अभियान अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यांनी दाद दिली.
गिरेड्डी पवनानंदची पत्नी सपनाक्काचा समावेश
आत्मसमर्पण केलेल्या १२ माओवाद्यांवर एक कोटीहून अधिक रुपयांची बक्षीसे होती. डीव्हीसीएम सपनाक्का (दंडकारण्य स्पेशल स्पेशन झोनल कमिटी सदस्य गिरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह डीव्हीसीएम दर्जाचे चार वरिष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एरिया कमिटी मेंबर व एक सदस्य यांचा यात समावेश आहे.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….