आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृ्त्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू :- “आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली.
यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त चाहते जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या RCB ने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करुन आयपीएल 2025 च्या चषकावर नाव कोरलं. तब्बल 18 वर्षांनी RCB ने मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड आहे. त्यामुळेच आज बंगळुरुत अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले आहेत.
आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 10 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आरसीबीनं आयपीएलच्या 18 व्या हंगामाचं विजेतेपद पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 धावांनी पराभूत करत जिंकलं यानंतर बंगळुरुत काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे. आज सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार होता. मात्र, आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या देखील वाढू शकते. याशिवाय 10 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती.
स्टेडियमजवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीनं जाम झाले होते. यामुळं मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. आरसीबीची विजेती टीम विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. द हिंदूनं दिलेल्या माहितीनुसार काही जखमींना शिवाजीनगर भागातील बॉवरिंग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं.
आरसीबीची टीम चिन्नास्वामी मैदानावर दाखल होण्यापूर्वी कर्नाटकच्या विधानसौदामध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला होता.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”