मोदी-पुतीन यांची दूरध्वनीवर चर्चा; दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात रशियाचे भारताला पाठबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पहलगामच्या हल्ल्याची निर्भर्त्सना करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण स्वीकारुन पुतीन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
पुतीन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पहलगामच्या हल्ल्यात मरण पावलेल्या २६ नागरिकांविषयी संवेदना व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या संवादादरम्यान हा हल्ला घडवून आणणारे आणि त्याच्या कटात सामील असलेल्यांना कठोर दंड देण्यावर पुतीन यांनी भर दिला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ‘एक्स’वर केलेल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली. ”अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निर्दोष लोकांच्या मृत्यूवर शोक संवेदना व्यक्त केली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण स्वीकारुन रशियाचे अध्यक्ष पुतीन चार वर्षानंतर प्रथमच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुतीन यांच्या दौऱ्याची वेळ ठरली नसली तरी त्याची तयारी सुरू झाली आहे.
युक्रेनविरुद्ध २०२२ मध्ये रशियाचे युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. २०२१ मध्ये पुतीन अवघ्या चार तासांसाठी भारतात आले होते. गेल्यावर्षी झालेल्या जी-२० देशांच्या शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पुतीन दिल्लीत आले नव्हते

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..